1. बातम्या

मी जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी..

आम्ही शेतकरी पीक लावून लाखोंचा जुगार लावत असतो, त्यामुळे आम्हाला देखील अटक करा, असे म्हणत आपलं दुःख मांडणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

onion farmar image google

onion farmar image google

आम्ही शेतकरी पीक लावून लाखोंचा जुगार लावत असतो, त्यामुळे आम्हाला देखील अटक करा, असे म्हणत आपलं दुःख मांडणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये शेतकरी म्हणत आहे, मी सुद्धा शेतात कांदे पिकावर जुगार खेळलो म्हणून मला जेल मध्ये टाका, असे विडिओमध्ये म्हटले आहे. बोरदहेगाव येथील शेतकऱ्यांने सोशल मिडियावर पोस्ट केल्याने या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.

मी काळ्या मातीत कांदे पिकावर तब्बल चार लाखांचा जुगार खेळलो. मात्र, अवकाळी पावसाने माझ्या 1200 क्विंटल कांद्याचा अक्षरक्ष: लाल चिखल केला आहे, त्यामुळे आता मला पण अटक करा असे म्हणत या शेतकऱ्याने आपलं दुःख व्यक्त केले आहे. ज्ञानेश्वर उगले असे नुक्सानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

कारखान्यांच्या साखर विक्री दरात दोनशे रुपयांनी वाढ, कारखान्यांना दिलासा...

दरम्यान, यावर्षी त्यांनी रब्बी हंगामात साडेपाच एकर क्षेत्रावर कांदे लावले होते. मेहनतीने पिकवलेले कांदे त्यांनी काढले. मात्र शेतात कांदे भरत असताना अचानक वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसाने काढलेले कांदे हे पूर्ण भिजले. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.

साखर उत्पादनात महाराष्ट्राला डंका! पटकवला जगात तिसरा क्रमांक..

तब्बल 1200 क्विंटल कांद्याचे चिखल झाले. या पिकासाठी रात्र-दिवस कष्ट घेतले. संपूर्ण कुटुंबाने अक्षरशः राबराबून पिकाची काळजी घेतली, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. यामुळे ते हताश झाले आहेत.

भात शेतीसोबत मत्स्यपालन करा, चांगले उत्पन्न मिळून दुप्पट उत्पन्न मिळेल
ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला नवीन कोरोना अत्यंत गंभीर, मोठी माहिती आली समोर
ब्रेकिंग! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला, मुंबईत मोठ्या घडामोडी..

English Summary: I gambled, arrest me, hearing the farmer's story brings tears to my eyes.. Published on: 05 May 2023, 05:46 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters