आपण बैल बाजार पहिला असेल, यामध्ये साधारणपणे बैलांची खरेदी विक्री लाखाच्या आतच होत असते, पण औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील एका शेतकऱ्याने शंकरपटाचा बैल १७ लाख ५१ हजार रुपयाला विकला आहे. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने हा बैल खरेदी केला होता.
एवढ्या मोठ्या रकमेसाठी बैलांची विक्री होत असल्याने हौसाची किंमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शंकरपाट क्षेत्रात हा खरेदीदार शेतकरी सक्रिय आहे. त्यांच्याकडे चार बैलजोडी आहे, प्रत्येक शंकरपटात ते सहभागी होतात. औरंगाबाद जिल्ह्यातील तळेगाव येथील संदुखान राजेखान याने शंकरपटातील दोन बैलांचा सांभाळ केला आहे. त्यापैकी एकाने बैल विकला आहे.
शंकरपटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या बैलांना दररोज दहा लिटर दूध, अंडी, बदाम, उडीद डाळ, शालू ज्वारीचा चारा आणि हिरवा चारा देण्यात आला. त्यामुळे या बैलजोडीने अनेक शंकरपट जिंकले होते. या बैलांना विशेष मागणी असते.
बैल खरेदी करणाऱ्याविषयी जास्त माहिती मिळाली नाही, पण या बैलाचा व्यवहार घाटातच झाले असल्याचे समजते. त्यामुळे यावरून समजते आजही लोक पाळीव प्राण्यांवर किती मोठे व्यवहार करतात.
महत्वाच्या बातम्या
युरिया खत खरेदीसाठी नवा नियम लागू; तीन गोण्यांसोबत घ्याव्या लागणार "या" दोन बाटल्या
Share your comments