आजपासून पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोन दिवसीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांना हात घातला, यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. सध्या साखर उत्पादन क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या समस्या आहे, यामध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच यातून मार्ग देखील काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की मला साखरेतील काही कळत नाही. प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो. मग त्यावर बाळासाहेब थोरात, अजितदादा, कधी राजेश टोपे मार्ग काढतात, शरद पवार यांचे अभिनंदन कारण त्यांनी साखरेचा गोडवा राजकारणात आणला आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वपक्षीय राजकारणी इथे एकत्र आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच मी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्यांनी प्रेमाने आणि आदराने या कार्यक्रमासाठी बोलावले होत. पण मी अजून हळूहळू पावलं टाकतोय, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच गडकरींचे भाषण एकूण मला वाटले की आपणही साखर कारखाना काढावा. पण मी काढणार नाही. कारण गडकरींचेच वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
व्यापाऱ्यांनी कांदा विकला नाही, मग शेतकऱ्यांनी दाखवला हिसका, शेतकऱ्यांनो तुम्हीही करा असा प्रयोग
तसेच या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान स्विकारून भविष्याचा वेध घेतला तर चांगली प्रगती साधता येईल. इथेनॉलकडे एक पर्यायी इंधन म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकार इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महत्वाच्या बातम्या;
ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण, घटनेने राज्यात खळबळ
शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस शिवून दिल्याबद्दल दादा तुमचे आभार
मोदी सरकारची 10 लाखांची घोषणा! आता मिळणार हमीशिवाय 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज...
Published on: 04 June 2022, 03:25 IST