1. बातम्या

माझं मत - ''शेती करा समाधानी राहा''

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे. हे आपण प्रत्येक शेतकरी नेत्याच्या भाषणात ऐकत किंवा वर्तमानपत्रात सातत्याने वाचत आलोय. त्याचबरोबर शेतीचे प्रश्नही आपण नेहमी ऐकत किंवा वाचत असतोच.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
farming

farming

आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे. हे आपण प्रत्येक शेतकरी नेत्याच्या भाषणात ऐकत किंवा वर्तमानपत्रात सातत्याने वाचत आलोय. त्याचबरोबर शेतीचे प्रश्नही आपण नेहमी ऐकत किंवा वाचत असतोच. शेतीचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे आपण खचून जाण्याची आवश्यकता नाही.

आपण शेती करतोय म्हणून अपराधीपणा वाटून घेऊ नका. मजेशीर आयुष्य जगा. पैसे मिळवाल तेव्हा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मनसोक्त खर्च करा. त्याने मागे कष्ट करणारांची उमेद वाढेल. जमिनी विकत घेण्याच्या फंदात पडू नका. आपल्याला माहिती आहेच की अन्य व्यावसायिक एका व्यवसायाचा दुसरा व्यवसाय करत असतो, तो व्यवसाय वाढवत असतो परंतु शेतीच्या बाबतीत जर बघितल तर निव्वळ शेतीच्याच मिळणाऱ्या उत्पन्नात आपण आणखी शेती घेणे कठीण आहे.

शेतीच घ्यायची झाली तर त्यासाठी कर्ज काढावे लागते आणि कर्ज काढून ते फेडण्यासाठी व त्याच्या व्याजासाठी कुटंबाला राबवून त्यांच्या दुःखाला कारण ठरू नका. कारण शेवटी अपेक्षा ह्या न संपणाऱ्या आहेत त्यामुळे आहे त्यातच समाधानी राहणं खूप महत्त्वाचं आहे. जग बदललंय. आपणही बदला. येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून खूप काही साठवून ठेवण्याच्या विचारात पडूच नका. लोकं पाच पंचवीस हजार पगारात टाप टिप राहतात आणि आनंदात जिवन जगतात. तुमच्या कष्टातून जे पैसे येतील त्यातील पन्नास टक्के जरी खर्च केले तरी खूप आनंदी जीवन तुम्ही जगू शकता. आपल्या वाडवडीलांनी खूप काही भोगलं ते आपल्यालाचांगले दिवस यावेत म्हणून. तो उद्देश त्यांचा पूर्ण होऊ द्या. स्वतःच्या व्यक्तीमत्वाला जपा.

 

वेगवेगळे छंद जपत चला. समाजात मिसळताना टापटीपपणे रहा. कारण शेवटी शेतकरीच या जगाचा पोशिंदा आहे, तो जगाला तरच देश जगेल, शेतकरीच या देशाचा मोठा ब्ँड आहे. काही गोष्टी दुर्लक्षित राहिल्या म्हणून शेतकरी हा ब्रँड व्हायचा सोडून आऊटडेटेड होत चालला आहे, उगाच शेतकर्यांना पोरी पण देत नाही असं म्हणून स्वतः वरच टिका करत बसू नका. तुमची लाईफ स्टाईल सुधारा आपोआप सर्व गोष्टी बदलतील. शेवटी आपल्या हातात आहे कोणाला कसं जगवायच. कष्ट करू वाटत नाही म्हणून शेतीत काहीच नाही म्हणणारी अनेक रिकामटेकडी माणसं भेटतील.

 

शेती न पुरणारा व्यवसाय आहे त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कोणी काहीही म्हणो या जगात शेती शिवाय दुसरा चांगला पर्यायच नाही हे सत्य आहे...!! प्रगतशील असण्याबरोबरच प्रयोगशील बना. कारण प्रयोगशील बनल्यावरच आपण शेती चांगली व परवडणारी शेती करू शकू, त्याचबरोबर शेतीतील तंत्रज्ञान स्वीकारत चला, चांगले कपडे, चांगले विचार, चांगले राहणीमान ही काळाची गरज आहे हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. शेती हा खूप चांगला आणि परवडणारा व्यवसाय आहे कारण मीसुद्धा एक शेतकरी पुत्र आणि कृषीचा विद्यार्थी आहे, लवकरच शेतीला ब्रँड बनवू हा निर्धार मनात ठेवून काम करूया.

गोपाल उगले,
कृषि महाविद्यालय, अकोला
मो- 9503537577

English Summary: I am a farmer, my opinion - ''do farming, be satisfied'' Published on: 30 April 2021, 03:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters