1. बातम्या

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रालाही इशारा, पावसाचा जोर वाढणार

मुंबई: गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

मुंबई: गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या 12 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे.

 

याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच मुंबईसहित कोकणातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
परतीच्या पावसाचा होणार उशीर

जून महिन्यात मान्सूनने दिमाखात आगमन केल्यानंतर, राज्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. पण यंदा परतीच्या पावसाचा काहीसा उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 8 ऑक्टोबरपासून राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही उशीरा परतीचा पाऊस दाखल होणार आहे.

English Summary: Hurricane threat in Bay of Bengal; Warning to Maharashtra too, heavy rains will increase Published on: 25 September 2021, 04:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters