सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. शिवाय सतत होणारा वातावरणातील बदल यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा चिंतेत आहे. सध्या आपल्या देशात असनी चक्रीवादळाच संकट आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज आणि उद्या काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.याचबरोबर जे कोळी बांधव मच्छी मार करण्यासाठी समुद्रात जातात त्यांना सुद्धा समुद्रात न जाण्याचे आदेश दिले आहेत. या तीव्र चक्री वादळाच रूपांतर तीव्र वादळात होऊन 48 तासानंतर या वादळाची तीव्रता ही कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
वादळाची तीव्रता हळुहळु कमी होईल:
असनी चक्रीवादळ हे मंगळवारी म्हणजेच आज उत्तर आंध्र-ओडिशा किनाऱ्यापासून उत्तर-पूर्वेकडे आणि लगतच्या वायव्य-पश्चिम दिशेच्या बंगालच्या उपसागराकडे वळून ओडिशाच्या किनाऱ्यापासून उत्तर-पश्चिमच्या बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्री वादळाचे रूपांतर बुधवारी तीव्र वादळात होईल आणि वादळाची तीव्रता हळुहळु कमी होईल असा अंदाज हवामान खात्यांने सांगितला आहे.येत्या ५ दिवसांत ईशान्य भारतात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे याचबरोबर देशातील विविध राज्यात सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
10 आणि 12 मे च्या दरम्यान अरुणाचल प्रदेशात आणि 12 मे दरम्यान आसाम-मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.तसेच 12 तारखेदरम्यान राजस्थानच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील मध्य महाराष्ट्रात देखील आज पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 9 ते 12 मे दरम्यान आणि दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि दक्षिण पंजाबमध्ये 10 ते 12 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
10 तारखेच्या संध्याकाळपासून ओडिशा किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीच्या परिसरात हलका ते मध्य आणि तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 मे रोजी ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात मध्यम प्रतीचा पाऊस अपेक्षित आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.त्यामुळे पावसाच्या आधी शेतीची खोळंबलेली कामे आवरून घ्यावीत शिवाय जर रानात उन्हाळी खते टाकली असतील तर राणे नांगरून घ्यावीत जेणेकरून रानातील खत वाहून जाणार नाहीत. आणि नुकसानापासून शेतकरी बांधवांचा बचाव होईल.
Share your comments