multilevel cropping
बहुमजली पीक पद्धती जर पहायले गेले तर पिकांच्या उंची नुसार आणि त्याच्या क्रमाने पिकांची लागवड केली जाते.प्रथमता पिकाची लागवड करताना जास्त उंची असणारी झाडे लावली जातात नंतर मध्यम उंची असणारी झाडे लावली जातात आणि त्यानंतर म्हणजेच शेवटी कमी उंची असलेली झाडे लावणे अशा प्रकारे बहुमजली पिकांची लागवड करण्यात येते.
चांगले उत्पादन सुद्धा भेटणार:
बहुमजली पीक पद्धतीमध्ये काही पिकांना जास्त उष्णता मानवत नाही आणि त्या पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जे की त्यामधून अधिक उत्पादन घेण्यासाठी सावलीची गरज असते.आणि या साठीच वेगवेगळ्या उंचीची झाडे लावणे गरजेचे असते जे की एका पिकाला दुसऱ्या पिकाच्या सावली पडते.याचे जर उत्तम उदाहरण पहायले गेले तर जास्त उंची असलेल्या नारळाच्या बागेमध्ये कोको सारखी मध्यम उंचीची झाडे लावणे आणि त्याच्या खाली कोथिंबीर किंवा इतर भाज्यांची लागवड करणे.यामध्ये असे की नारळाच्या झाडाची सावली कोको झाडाला पडणार आणि कोको झाडाची सावली भाज्यांना लागणार आणि यामधून चांगले उत्पादन सुद्धा भेटणार आणि एका पिकापासून दुसऱ्या पिकाला सावली सुद्धा भेटणार.
हेही वाचा:सणासुदीच्या काळात तेलाचे आणि तेलबियांचे भाव वाढले, कंपन्या विक्रमी दराने करत आहेत खरेदी
बहुमजली पीक घेण्याचे फायदे -
१. बहुमजली पिकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच जमिनीतून तुम्ही अनेक प्रकारची पिके घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही आणि खर्च सुदधा जास्त लागत नाही. तुम्ही वर्षात अनेक पिकातून अनेक प्रकारच्या पिकातून उत्पादन काढू शकत.
२. प्रत्येक पिकाला आपल्याला मशागत करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला खूप खर्च जातो मात्र बहुमजली पीक घेतल्याने सर्वात एक मोठा फायदा म्हणजे मशागतीचा खर्च यामधून वाचतो.
३. एकाच जमिनीवर वेगवेगळी पिके घेतल्याने रोग आणि किड पासून पिकाचे सरंक्षण होते त्यामुळे पिकाचे नुकसान सुद्धा होत नाही आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे भेटते.
४. मजूर पुरवठा सुद्धा चांगल्या प्रकारे होतो आणि मजूर सुद्धा काम करतात.
५. बहुमजली पीक घेतल्याने प्रत्येक पिकाच्या काढणीचा जो वेळ आहे तो वेगवेगळा असतो.
६. जर पीक सरंक्षनाची गरज लागली तर कीड नियंत्रण करण्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
७. बहुमजली पीक घेतल्याने शेतात पिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे अवजारे वापरण्यावर मर्यादा येतात मात्र मजूर मोठ्या प्रमाणात लागतात आणि खर्च सुद्धा वाढतो.
Share your comments