1. बातम्या

खाते उतारे आणि आठ अ उतारे ऑनलाइन पद्धतीने कसे पाहणार?

khate utaara

khate utaara

 जेव्हा आपण एखादी जमीन विकत घ्यायची ठरवतो तेव्हा त्या जमिनी विषयी भूतकाळातील इत्थंभूत माहिती असणे आवश्यक असते. म्हणजे क्या  जमिनीचा मागील इतिहास म्हणजे जशी की ती जमीन अगोदर कुणाची होती, तिच्यात कोणकोणते बदल करण्यात आलेली त्याची माहिती आपल्याला असणे फार आवश्यक आणि महत्त्वाचे असते. जर आपल्याला संबंधित माहिती घ्यायची असेल तर ती जमीनीसंबंधीचे महत्त्वाचे कागदपत्रम्हणजेच सातबारा,खाते उतारा, फेरफार उतारे इत्यादी मधून मिळते. ही सगळी शेती संबंधित कागदपत्रे हे जवळजवळ 1880 सालापासून भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध आहेत.

परंतु सरकारने आता हे सगळे उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. लेखात आपण संबंधित उतारे  ऑनलाईन कसे पाहायचे किंवा कसे मिळवायचे यासंबंधीमाहिती घेणार आहोत.

जूने अभिलेख ऑनलाईन कसे पहावे?
  • सर्वप्रथम शेती संबंधित जुनी अभिलेख काढण्यासाठी तुम्हाला mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ सर्च करावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्या समोर एक महसूल विभागाची वेबसाईट ओपन होते.

  • या ओपन झालेल्या पेजवरील ई रेकॉर्ड या पर्यायावर क्लिक करायचे.

  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते, उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता.

  • जर तुम्ही या संकेतस्थळावर पहिल्यांदा आले असाल तर तुम्हाला तुमचं स्वतःचा लोगिन आयडी तयार करावा लागतो.त्यासाठी तुम्हाला नवीन वापर करता नोंदणी या पर्यायावर क्लिक करावी लागते. तुमच्या समोर एक फार्म ओपन होतो. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यायची असते. म्हणजेच तुमचे नाव, मधले नाव आणि आडनाव त्यानंतर तुमचे जेंडर, नॅशनॅलिटी आणि त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा असतो. तसेच तुम्ही कुठला व्यवसाय करतात यासंबंधीचा तपशील भरावा लागतो. झाल्यानंतर तुमचा स्वतःचा मेल आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे. तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्त्या विषयी तडफदार माहिती सांगायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा घर क्रमांक, मजला क्रमांक, इमारत किंवा  घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.

  • त्यानंतर पिन कोड टाकून तुमच्या जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप फार्म वर येऊन जाते. ती सगळी माहिती भरुन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा  लॉगिन आयडी तयार करायचा आहे. जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर चार ते पाच सोपे प्रश्न विचारले जातात त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर द्यायला लागते. त्यानंतर कॅपच्या कोड टाइप करायचा असतो. हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सबमित बटन दाबायचा आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापर करताना नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली येथे क्लिक करा असा आशयचा मेसेज येतो, त्यावर क्लिक क्लिक करायचे आहे. ही नोंदणी पूर्ण होते.

  • त्यानंतर तुम्हाला परत तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेली युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन  करायचे आहे.

 

आता पण फेरफार उतारे कसे पहावे ते बघू

यासाठी सगळ्यात आगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, तुमच्या गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कोणता उतारा हवा आहे. ते निवडावे लागते मला जास्त तुम्हाला जर सातबारा हवा असेल तर सातबारा, 8अ चा उतारा हवा असेल तर आठ अ पर्याय निवडायचा आहे. यामध्ये जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्हाला संबंधित शेतीचा गट क्रमांक टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही टाकलेल्या सर्च या पेजवर संबंधित गट क्रमांकविषयी संपूर्ण माहिती मिळते.

संबंधित तुम्ही शोधलेल्या कागदपत्राचे वर्ष आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. त्यावर तुम्ही क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 

त्यानंतर तुमचे कार्ट तुमच्यासमोर ओपन होते. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं तरी डाउनलोड सारांश नावाचा एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, त्याचे तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्या समोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुम्हाला हवे असलेले पत्रक ओपन होते. या पत्रकावर ईल खाली भान असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होते.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters