1. बातम्या

आधार कार्ड नकली आहे का असली ते कसे तपासावे

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Aadhar Card

Aadhar Card

आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र आहे. शाळेतील मुलांचे ऍडमिशन पासून तर अनेक सरकारी योजनांसाठी मिळणारे फायदे मिळवण्यासाठी आधार कार्ड  लागते. तसेच अन्य काही कामांसाठी आधारकार्ड गरजेचे आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे लागू करण्यात आलेल्या आधार कार्ड मध्ये डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहिती दिलेली असते. 

अशातच तुम्हाला जर माहिती झाले की तुमच्या आधार कार्ड नकली आहे तर  तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे तुम्हाला माहिती करून घेणे गरजेचे आहे की तुमचे आधार कार्ड असली आहे का नकली? हे माहिती करून घेणे फारच सोपे आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया घर बसून आधार कार्ड धारकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. आधार कार्ड धारक अगदी सोप्या पद्धतीने युआयडीएआय च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सोपे स्टेप्स फॉलो करून याबाबतची माहिती घेऊ शकता.

हेही वाचा:आधार कार्डमध्ये कोणता क्रमांक नोंदविला आहे, आता काही मिनिटांत शोधा

  जाणून घेऊया प्रक्रिया:

  • यूआयडीएआय च्या https://resident.uidai.gov.in/ adhaarverific वर भेट देऊ शकता.

  • त्यानंतर तुमच्यासमोर आधार व्हेरिफिकेशन पेज उघडेल

  • येथे दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचा बारा अंकी आधार नंबर नोंदवावा.

  • त्यानंतर डिस्प्लेवर दिसत असलेला कॅपचा  कोड नोंदवावा.

  • त्यानंतर व्हेरिफाय बटन वर क्लिक करावे.

  • जा तुमच्या आधार नंबर बरोबर असेल तर एक नवीन पेज ओपन होते.

  • जर तुमचा आधार नंबर नकली असेल तर इन व्हॅलिड आधार नंबर अस दिसेल.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters