2014 मध्ये देशात सत्तापरिवर्तन झाले, गेल्या अनेक दशकांपासून सत्तेत रूढ असलेल्या काँग्रेसला भाजपाने निष्कासित केले आणि आपले वर्चस्व काबीज केले. भाजपा सत्तेत आली आणि मान्य नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान केले, तेव्हापासून देशाचे पंतप्रधान म्हणून मान्य नरेंद्रजी मोदी यशस्वीरित्या काम पाहत आहेत. मोदी यांनी 2014 पासून अनेक कल्याणकारी योजना संपूर्ण देशात कार्यान्वित केल्या आहेत. केंद्र सरकारने तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या तसेच देशातील कामगार लोकांसाठी देखील अनेक महत्त्वपूर्ण योजना कार्यान्वित केल्या आहेत.
अशीच एक योजना आहे ही श्रमकार्ड. केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत एक विशिष्ट असे कार्ड बनविले जाते, हे कार्ड असंघटीत क्षेत्रातील अनेक श्रमिकांना फायद्याचे ठरू शकते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशातील असंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करीत आहेत व आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित आहेत. जर आपणही शेतमजूर, बांधकाम कामगार, भाजी विक्रेते, घरगुती नोकर किंवा इतर प्रकारचे मजूर आहात तर आपण देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. त्यामुळे जर आपणही असंघटित क्षेत्रात कार्य करत असाल तर आपण या योजनेत रजिस्ट्रेशन करून फायदा घेऊ शकता. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, या योजनेअंतर्गत पात्र श्रमिकांना पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.
त्याव्यतिरिक्त देखिल आगामी काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनेसाठी याचा उपयोग केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेश राज्यात ई-श्रम कार्डधारकांना 1000 रुपये प्रतिमहा देण्याचे मुख्यमंत्री योगी यांनी जाहीर केले आहे. उत्तर प्रदेश राज्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक हजार रुपये पात्र श्रमिकांच्या खात्यावर वर्ग देखील करण्यात आले आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया ई-श्रम कार्ड साठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस.
»मित्रांनो जर आपणांस ईश्रम कार्डसाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर सर्वप्रथम ईश्रम कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे.
» वेबसाइटवर भेट दिल्यानंतर रजिस्ट्रेशन साठी नोंदणीची लिंक मुख्य पृष्ठाच्या अगदी बाजूला असेल.
»त्यानंतर 'ई-श्रम नोंदणी' या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
»यानंतर, तुम्हाला आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
»त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा.
»त्यानंतर OTP टाकावा लागेल आणि त्यानंतर ई-श्रमसाठी नोंदणी फॉर्म उघडेल.
»त्यानंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
»एवढी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
Share your comments