चक्रीवादळ म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते निसर्गाचे महाभयंकर रूप, तुफान वादळ त्याच्यातच तुफान पावसाची भर अक्षरशः जिकडेतिकडे नुकसानच नुकसान करण्याची ताकद या चक्रीवादळा मध्ये असते. गेल्या मागच्या वर्षापासून विचार केला तर महाराष्ट्राला आत्ता पर्यंत दोन चक्रीवादळाचा प्रचंड प्रमाणात तडाखा बसला.
मागच्या वर्षी आले होते ते निसर्ग चक्री वादळ आणि आत्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी येऊन गेले ते तौक्ते चक्रीवादळ. या आलेल्या दोन्ही चक्रीवादळाने अक्षरशः शेतकऱ्यांचे आणि परिणामी संपूर्ण किनारपट्टीचे अतोनात नुकसान केले. परंतु या सगळ्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो तो हा की या चक्रीवादळांना नाव कोण आणि कसे दिले जाते? कारण हे अजून बऱ्याच जणांना माहितीच नाही. या लेखामध्ये आपण चक्रीवादळांना नावे कोणत्या संकल्पनांच्या आधारावर आणि कसे दिले जातात याबद्दल जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल; तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा घेणार आढावा
चक्रीवादळ म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होऊन हो तयार झालेला कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी चारही बाजूने वारे वाहू लागतात. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. बहुतांशी चक्रीवादळांची निर्मिती होते.
वादळांना नाव कोण देते?
चक्रीवादळांना नावे देण्याची सुरुवात ही सन 1953 वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि नॅशनल हरिकेन सेंटर यांनी केली. उत्तर अटलांटिक, मध्य उत्तर पॅसिफिक, पश्चिम उत्तर पॅसिफिक, दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक, दक्षिण अटलांटिक आणि पूर्व उत्तर पॅसिफिक इत्यादी जगभरातून तेरा भागांमधून चक्रीवादळांची नावे ठरवली जातात. जगभरातील महासागरा भोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावांवरून एक यादी तयार केली जाते.
चक्रीवादळांना नाव कसे देतात?
चक्रीवादळांना नाव देताना क्यू, वाय, झेड, यु, एक्स इत्यादी वर्णांचा वापर केला जात नाही. या नाव देण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर वादळाचा वेग ताशी 60 किमी पेक्षा कमी असेल अशा वादळांना नाव दिले जात नाही. तसेच एखाद्या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असेल तर त्या वादळाला दिले गेलेले नाव पुन्हा दिले जात नाही. 1978 सालापासून चक्रीवादळांना पुरुषांची नावे देण्यास सुरुवात झाली. त्याआधी फक्त महिलांची नावे दिली जात होती.
चक्रीवादळाला नाव देण्याचे फायदे
-
चक्रीवादळाला नाव देण्यामागे एक महत्त्वाचा फायदा असा की, स्वतंत्र नाव दिले गेल्यामुळे एखाद्या ठराविक भागात एकाच कालावधीत एक व त्यापेक्षा जास्त वादळे निर्माण झाली तर होणारा संभ्रम आणि गोंधळ टाळता येतो.
-
नाव दिल्यामुळे प्रत्येक वादळाला तात्काळ ओळखण्यास मदत होते.
-
वादळाच्या नावावरून आलेल्या चक्रीवादळा पासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून सावध करण्यास मदत होते.
-
तसेच स्वतंत्रपणे वादळांना नाव दिले गेल्याने त्यांचा स्वतंत्रपणे सूचीबद्ध अभ्यास करता येतो.
सप्टेंबर 2004 ते दोन हजार वीस या कालावधीसाठी उत्तर हिंदी महासागर क्षेत्रातील ट्रॉपिकल सायकलॉन्स ला नावे सुचवणारी 64 नावांची यादी निश्चित करण्यात आली. या पॅनल मध्ये जे देश आहेत त्यांच्या नावाच्या वर्णक्रमानुसार त्यांचा क्रम निश्चित करण्यात आला असून प्रत्येक देशाने सुचवलेल्या नावांचे आठ स्तंभ करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे जशीजशी चक्रीवादळे उद्भवतील त्याप्रमाणे त्या देशाने सुचविलेली नावे क्रमशा दिली जातात.
माहिती संदर्भ – प्रीतम. प्र. पाटील, एम. एस सी ( कृषी हवामान शास्त्र ) विद्यार्थी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी ( होय आम्ही शेतकरी कडून साभार)
Share your comments