छत्रपती संभाजीनगर
मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांत सर्वसाधारण १९ लाख ५० हजार ६९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची २४ लाख ६६ हजार हेक्टर पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. आता सोयाबीनवर काही जिल्ह्यांत काही ठिकाणी शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १९ लाख ५० हजार ६९२ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील ३ लाख ७८ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांतील १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
पीकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव
मागील वर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते. यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.
Share your comments