Cotton Market Update :- मागच्या हंगामामध्ये कापसाच्या बाजारभावाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर निराशा केली. शेतकऱ्यांनी कापसाचा बाजार भाव वाढेल या अपेक्षेने कापूस कित्येक दिवसांपर्यंत घरात साठवून ठेवला. तरी देखील कापसाच्या बाजारभावाने 8000 चा टप्पा पार केला नसल्याचे चित्र दिसून आले. अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस पडून आहे. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन कापूस घरामध्ये यायला लागेल. परंतु यावर्षी तरी कापसाचे बाजार भाव शेतकऱ्यांना तारतील का? हा मोठा प्रश्न आहे.
कारण वाढती महागाई आणि वाढलेला उत्पादन खर्च या दृष्टिकोनातून कापसाचे बाजार भाव चांगले असणे खूप गरजेचे आहे. या वर्षाचे जर कापूस लागवड आणि पावसाची स्थिती पाहिली तर पावसाने खंड दिल्यामुळे कापूस पिकाला याचा फटका बसण्याची देखील एक शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये कापसाचा भाव कसा राहील याबाबत जाणकारांकडून काही अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत व ते अंदाज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहेत.
कापसाची सद्यस्थिती आणि येणाऱ्या काळातील स्थिती कशी राहील?
सध्या जर आपण कापूस बाजाराचा विचार केला तर यामध्ये चढ-उतार दिसून येत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील आज कापसाच्या भावात वाढ दिसली. राज्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील कापूस खरेदी सुरूच आहे. परंतु कापूस बाजारातील आवक कमी झाली आहे कारण शेतकऱ्यांकडे सध्या कापूस जवळपास नाहीत जमा आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये कापसाचे आवक वाढेल अशी तरी शक्यता नाही. तसेच या हंगामाचा विचार केला तर सध्या सगळीकडे पावसाने खंड दिल्यामुळे या परिस्थितीचा फटका कापूस पिकाला बसण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात नाही तर प्रमुख कापूस उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटक तसेच गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यात देखील पावसाचा खंड पडल्यामुळे त्यादेखील कापूस पिकाला विपरीत फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर भारताचा विचार केला तर या ठिकाणी राजस्थान व पंजाब तसेच हरियाणा मध्ये देखील अगोदर झालेली अतिवृष्टी आणि आता पावसातील मोठा खंड याचा निश्चितच फटका कापूस पिकाला बसणार आहे. या सगळ्या परिस्थितीचा एकंदरीत अंदाज बांधला तर कापसाचे उत्पादन यावर्षी घटणार हे जवळजवळ स्पष्ट होत आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कापसाच्या उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता आहे. या सगळ्या कारणांमुळे येणाऱ्या काळात कापसाचे भाव तेजीत राहतील अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. कापसाच्या बाजार भावामध्ये थोडेफार चढउतार येतील परंतु कापसाचे भाव आताच्या सात हजार ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वरून वाढण्याची शक्यता देखील कापुस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणारा काळ कसा राहील? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Share your comments