सध्या महाराष्ट्रातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल यावर काम करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे अनेक भागात दिसून आले आहे. शेतकरी आता पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करू लागले आहेत.
महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने असाच एक नवीन प्रयोग केल आहे, मिश्र शेतीचा उपयोग करत त्यांनी बक्कळ उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्याचे नाव रामचंद्र चोपडे असं आहे. चोपडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड केली होती.
शेतीतील कलिंगड आणि मिरचीच्या पिकांना सुरवातीला अळी व भुरी लागली होती. पण चोपडे यांनी योग्य नियोजन करत अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात लावलेल्या मिरचीच्या पिकातून तब्बल सात लाखांचे उत्त्पन्न मिळवले आहे.
रामचंद्र चोपडे हे पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्यात नोकरी करतात. नोकरी करत असताना देखील त्यांनी शेतीची आवड जपली होती. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी नोकरी आणि शेतीत योग्य समतोल साधत मोठे यश मिळवले आहे.
नेहमीच आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या रामचंद्र चोपडे यांनी यावेळी आपल्या शेतात मिश्र शेतीचा प्रयोग केला. त्यांनी आपल्या शेतात २० गुंठ्यात कलिंगड आणि मिरची या दोन पिकांची लागवड केली. या पिकांना पाणी देण्यासाठी रामचंद्र यांनी ठिबकसिंचनाचा वापर केला.
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या रामचंद्र चोपडे यांच्याकडे चार एकर बागायती शेती आहे. शेती कमी असली तरी ते शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग असतात. त्यांनी असे प्रयोग करून पिकांचे उत्पादन वाढवले व नफा कमवला. रामचंद्र चोपडे आपल्या शेतात वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची देखील लागवड करतात त्यातून चांगला नफा मिळतो.
कलिंगड आणि मिरचीला सुरवातीला अळी व भुरी लागली होती. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्याचे ते सांगतात. त्यानंतर रामचंद्र यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत औषधांची फवारणी केली. वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड करण्यासाठी रामचंद्र यांना ७० हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते सांगतात पारंपारिक शेतीला नवीन प्रयोगाची जोड आवश्यक आहे असे केल्यास शेतकरी नक्कीच चांगले उत्पन्न घेऊ शकतो. रामचंद्र चोपडे यांना एक मुलगा आहे. तो देखील रामचंद्र यांना शेतीत मदत करतो.
महत्वाच्या बातम्या
गहू पिकाचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडे बोनसची मागणी
Onion Farming : उन्हाळ्यात कांदा पिकाचे व्यवस्थापण; वाचा या महत्वपूर्ण माहितीविषयी
Share your comments