भारतामध्ये हवामानाची दिशा निश्चित करण्यामध्ये मान्सूनचे महत्त्वाचे योगदान आहे हवेमुळे मान्सूनची निर्मिती होते वही हवा सतत बदलत आहे.त्यामुळे भारताच्या हवामान हे उष्ण होत आहे. नेहमी दुष्काळ किंवा पूर परिस्थिती वाढत असून थंडीच्या लाटेत कमी येत आहे.
हे मत इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडींग च्या मान्सून सिस्टीम चे प्राध्यापक अँड्रु टर्नर यांनी नोंदवले आहे ते भारतीय मान्सूनचेतज्ञ आहेत.
भारताच्या हवामानात बदल होत आहे का?
अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असून त्यामुळेच भारताची वातावरण सतत बदलत असून त्यामध्ये आद्रतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पावसाचे ढग जास्त वेळ आद्रता रोखू शकत नाहीत आणि कमी वेळात जास्त पाऊस होतो.त्यामुळे पावसाचीव्याप्ती कमी होत असून पावसाच्या दिवसांमधील अंतरही वाढत आहे. म्हणूनच दुष्काळ पडणे आणि उष्णतेची लाट येणे हे घडत आहे.हिवाळा ऋतूत पश्चिमेकडून येणारी हवा अरबी समुद्रावरून जात उष्ण होत आहे. त्यामुळे भारतात हिवाळ्यात दिवसा तापमान वाढत आहे तर रात्री थंडी वाढत आहे.
का होत आहेत हे बदल?
ग्रींनहाऊस वायूंचे उत्सर्जन आणि हवेत एअरो सल्फेट वाढल्याने वायु मंडळाचे तापमान वाढत आहे. त्यामुळे जमीन आणि समुद्र या दोन्हींच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत आहे. याचाच परिणाम मान्सूनवर होत आहे.भारताच्या मान्सून चा अभ्यासहा 1950 सालापासून केला जात आहे. त्यावरून असे आढळले आहे की मान्सून वर्ष 2002 पर्यंत कमजोर होत गेला आहे. 2002 नंतर पडणाऱ्या पावसाचे प्रमाणात घट झाली नाही परंतुपावसाच्या एकूण दिवसांची संख्या घटत आहे. भारतामध्ये होत असलेली मोठ्या प्रमाणातील जंगलतोड आणि शेतीच्या जमिनीत होणारी वाढ ही त्यामागील कारण आहे. जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीवरून बाष्पीकरण कमी झाले आहे. जमीन आणि शेतीसाठी 7 सेंटीमीटर पेक्षा कमी पावसाचे दिवस फायदेशीर असतात. त्या दिवसांची संख्या घटत असून उलट 7 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या दिवसात वाढ होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे.
तसेच भारतात वाढलेल्या औद्योगिकरणामुळे वायूमंडलातील ऐअरोसल्फेट चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भारताचा मान्सून कमजोर होत आहे.
काय आहे यावरील उपाय योजना?
देशात झाडांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.भारतासारख्या देशाने जर जगातील जंगले वाचवण्याचा व वाढवण्याचा मोहिमेचे नेतृत्व केले तर फायदाच होईल.जर तसे झाले नाही तर शेती करणे कठीण होईल. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे लोकांचे पलायन वाढेल आणि पूर वादळामुळे मृत्युमुखी पडणार लोकांची संख्याही वाढेल. (स्त्रोत-दिव्य मराठी)
Share your comments