मराठवाड्यातील हिंगोला मधील संत नामदेव बाजारात हळदीचे एक वेगळेच महत्व आहे. बाजारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती मात्र मध्यंतरी ढगाळ वातावरण झाले त्यामुळे हळद पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा परिणाम हळदीच्या उत्पादनावर दिसून येत आहे. संत नामदेव बाजारात परराज्यातून सुद्धा हळद दाखल होते मात्र मागील काही दिवसात पीक अंतिम टप्यात असताना करप्या रोगाच्या प्रदुर्भावाने उत्पादनावर परिणाम झाला. सध्या बाजारात हळदीचे समाधानकारक दर आहेत तरी सुद्धा शेतकऱ्याना अधिक दराची अपेक्षा आहे.
हळदीला प्रति क्विंटल 9 हजार 600 रुपये दर...
हिंगोली बाजारात मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते जे की हळदीचे वजन झाले की शेतकऱ्यांच्या हाती लगेच पैसे दिले जातात त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून तसेच दुसऱ्या राज्यातून सुद्धा शेतकरी तिथे हळद घेऊन येतात. मात्र यंदा करपा रोगाच्या प्रादुर्भावाने हळदीच्या उत्पादनात घट झाली त्यामुळे भविष्यात दर वाढतील असा अंदाज वर्तविला गेला आहे. सध्याच्या स्थितीला हळदीचा दर प्रति क्विंटल ९ हजार ६०० रुपये आहे मात्र शेतकऱ्यांना १५००० रुपये प्रति क्विंटल दर भेटावा अशी अपेक्षा आहे.
करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रत्येक पिकावर...
जसा खरीप हंगामात रोगाचा प्रादुर्भाव राहतो तसेच रब्बी हंगामात सुद्धा करपा रोगाचा प्रादुर्भाव कायम राहिलेला आहे. याआधी कांदा पिकावर फक्त करपा रोगाचा प्रादुर्भाव पडायचा मात्र आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर किडीला पोषक वातावरण आहे त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. हंगामाच्या सुरुवातीस बाजारात जशी हळदीची आवक झाली त्यावेळी कोणताही परिणाम न्हवता मात्र आता नव्याने बाजारात दाखल होणाऱ्या हळदीवर परिणाम होत आहे असे व्यापारी वर्ग सांगतो.
यामुळे हिंगोलीच्या हळदीला आहे मागणी...
मराठवाड्यासह विदर्भातील खूप भागातून हिंगोळीमध्ये हळद दाखल होते जे की बाजारात चोख व्यवहार असल्याने शेतकरी या बाजारपेठेकडे ओळतात. हळदीमध्ये कुकुरमीन चे प्रमाण असल्याने सातारा, सांगली या भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Share your comments