1. बातम्या

जबरी! नगरच्या शेतकऱ्यांचा नसता राडा…! शेतात लावलेत गांज्याचे झाडे, पण…

महाराष्ट्रात गेल्या महिन्यात एका शेतकरीचे पत्र चांगलंच वायरल झालं होत त्याच कारण असं होत की, पत्र लिहणाऱ्या शेतकऱ्याने सरकारदरबारी गांज्याची शेती करण्याची परवानगी मागितली होती. हे प्रकरण खुपच चर्चेत आलं होत. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली पण ह्या घडनेत पत्र लिहले गेले नाही तर पत्रातील कृती केली गेली आहे आणि चक्क शेतकऱ्यांनी गाज्यांचा मळा फुलवला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
hemp

hemp

महाराष्ट्रात गेल्या महिन्यात एका शेतकरीचे पत्र चांगलंच वायरल झालं होत त्याच कारण असं होत की, पत्र लिहणाऱ्या शेतकऱ्याने सरकारदरबारी गांज्याची शेती करण्याची परवानगी मागितली होती. हे प्रकरण खुपच चर्चेत आलं होत. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली पण ह्या घडनेत पत्र लिहले गेले नाही तर पत्रातील कृती केली गेली आहे आणि चक्क शेतकऱ्यांनी गाज्यांचा मळा फुलवला आहे.

कारखाने असणारा जिल्हा म्हणुन अहमदनगर ख्यातीप्राप्त आहे, आणि आपल्या ऐतिहासिक वारस्यामुळे नगर जिल्हा कायम चर्चेत असतो, पण आज नगर जिल्हा चर्चेत आला तो अकोले तालुक्यातील वारघुशी गावातील शेतकऱ्यांच्या नसत्या राड्यामुळे. त्याचे झाल असं की, वारघुशी गावातील कळम देविवाडी येथील डोंगरदरीत काही शेतकऱ्यांनी चक्क गांज्याचे मळे फुलवलेत. आणि ह्यासंबंधी पोलिसांना सूत्रांद्वारे माहिती मिळाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तेथे धाड टाकली.

सलग दोन दिवस कार्यवाही

आपल्या गुप्त सूत्रांच्या माहितेद्वारे पोलिसांनी त्या शेतात अचानक धाड टाकली. डोंगरदऱ्यात हा गांज्याचा मळा फुलवला गेला होता त्यामुळे तिथे मोटारणे जाने अशक्य होते त्यामुळे पोलिसांच्या पथकांनी पायी चालत जाऊन गांज्याचा ह्या शेतीचा शोध लावला आणि शेतकऱ्यांचा हा आगाऊ राडा सापडवून काढला. ह्या संबंधी सलग दोन दिवस पोलीस कार्यवाही चालू होती. पोलिसांनी जवळपास 2 लाख 70 हजार रुपये किमतीची गांज्याची तब्बल 270 किलोंची झाडे जप्त केली.

 पोलिसांनी दाखल केला गुन्हा

वारघुशी गावातील कळम देविवाडी येथील डोंगरदरीत चार शेतकऱ्यांनी गांज्याची बाग फुलवली होती. याबाबतीत राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे ह्यांनी ह्याबाबत सखोल माहिती देताना सांगितले की, ह्या प्रकरणात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांची नावे ही मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, आणि चंदर देवराम लोटे असे आहेत. ह्या चारी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि गांज्याची झाडे जप्त केल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.

 प्रकरणातून काय होते सिद्ध

शेतकरी मित्रांनो अनियमित हवामानमुळे, सरकारच्या धोरणामुळे किंवा आणि काही कारणामुळे शेती परवडत नाही म्हणुन गांज्याची मळे फुलवणे किंवा अजून काही आमलीय पदार्थांची शेती करणे हा पर्याय नाहीय. आपण आपल्या हक्कासाठी आवाज बुलंद करावा पण कायदे मोडू नये, त्यामुळे आपण आपल्या पिढीला चांगला आदर्श नाही देत आहात. आपल्या गौरवपूर्ण इतिहासासाठी हे योग्य नाही.

 Source - ahmednagarlive24

English Summary: hemp cultivation in ahemednager farmer in his farm farmer arrested Published on: 04 October 2021, 10:10 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters