खामगाव ( khamgaon ) तालुक्यातील आंबेटाकळी गावासह परिसरामध्ये जवळपास अर्ध्या तासापासून विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. बोरीअडगाव परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होत आहे. शेतकऱ्याच्या शेतातील गहू, हरभरा हे पीक घरात आले असले तरी गारपीट आणि अवकाळी पावसाचा कांदा आणि फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यासह काढणी आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तर आंबा तसेच भाजीपाला व फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे, बिजोटे व भडाणे परिसरात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी अवकाळी पाऊस सुरू, अचानक पडलेल्या पावसामुळे एकच धावपळ, व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
महावितरण घेणार तब्बल २९ हजार २३० कोटींचे कर्ज, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता..
या पावसामुळे सध्या राहिलेल्या उन्हाळी मूग, कांदाबीज, उत्पादन कांदा, आंबा मोहर, नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसानं, काही गावांना चांगलच झोडपून काढलं. साधारण अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते.
यावेळी नागरिकांची पावसानं मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला याचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात, केली मोठी मागणी..
आयकर विभागाकडून देशातील जनतेवर ४४ हजार कोटीची दरोडा, राजू शेट्टी यांच्या आरोपाने खळबळ
PNG-CNG चे दर कमी होणार, दर महिन्याला ठरणार दर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..
Share your comments