
गेल्या काही दिवसांपासून मराठावाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस होत आहे. आता मात्र या भागात होणाऱ्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. यासह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

mumbai rain
मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी परिसररात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला. मात्र आता या स्थितीचा प्रभाव कमी होऊ लागल्याने पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक भागात काहीशी विश्रांती राहणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाची उघडीप असून कडक ऊन पडल्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातही काहीशी अशीच स्थिती आहे. आज नगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर उस्मानाबाद भागात हलक्या पावसाच्या सरी पडतील. राज्यात उद्या गुरुवारी पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, जिल्ह्यात काही भागात मध्यम पाऊस पडेल.
दरम्यान मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे.

photo ANI
चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली. दरम्यान, आजही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांना सुट्टी देण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Share your comments