मागील वर्षासारखे या वर्षीही मॉन्सून हंगाम चांगला राहणार आहे. पावसाळ्यातील जून- जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर यंदा पाऊस दमदार झाला तर शेतकऱ्यांचे उत्पन्नात घसघसीत वाढ होण्याची आशा आहे. ही बातमी शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण भारतातील दोन तृतीयांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे.
हवामानाविषयी अंदाज वर्तवणारी ऑस्ट्रेलियाची जगातील सर्वात मोठं हवामान विभाग स्टीरने याविषयीची माहिती दिली आहे. स्टीरच्या मते यावर्षी सामान्य पाऊस राहणार आहे. म्हणजेच जून- जुलै आणि ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाची हवामान विज्ञान ब्युरोच्या मते , यावर्षी ला नीना आणि एल नीनो हे वादळ येण्याची शक्यता नाही. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अजून याविषयी कोणताच अंदाज वर्तवलेला नाही. साधरण एप्रिल महिन्याच्या आधी अंदाज वर्तवला जाईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान अजून एका हवामान विभागाने आपला अंदाज वर्तवला आहे, त्यांच्या मते यंदा भारतात दुष्काळ पडणार नाही.
दरम्यान बिहार, झारखंडसह उत्तर भारतातील अनेक राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीला धानाची पेरणी केली जाते. जर यावर्षी पुर्व - मॉन्सूनमध्ये चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना शेती तयार करण्यास मदत होईल. वेळेवर पेरणी झाली तर उत्पन्न अधिक होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सून दगा करणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
दरम्यान मॉन्सूनचा सर्वात मोठा परिणाम हा ग्रामीण भागावर होत असतो, पाऊस चांगला झाला तर ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढत असते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था सुधारत असते.
Share your comments