1. बातम्या

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर रविवारी मॉन्सून परत बॅक टू एक्शनवर आला आहे. रविवारीच्या सकाळपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार, तर कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी पावासाने हजेरी लावली आहे.  या पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले असून धरणसाठ्यातही वाढ होत आहे. मराठावाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास सर्व भागात हलका ते जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यातील तीन व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. औरंगाबाद, जालना, जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. 

दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. शेतात पाणी तुंबले आहे. दरम्यान काही भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी तुंबल्याने आणि अति पाऊस झाल्याने शेतातील उगवलेली पिके वाहून गेली आहेत.  नगर जिल्ह्याच्या अनेक भागात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. जिल्ह्यात यंदाा १८१.१४ टक्के पाऊस झाला आहे. नगर तालुक्यात सर्वाधिक १५० टक्के पाऊस झाला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी सुखावला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात देखील दमदार पाऊस झाला आहे. येथील घटप्रभा नदीवरील फाटवाडी प्रकल्प ९९ टक्के भरला आहे. दोन दिवसापुर्वीच प्रकल्पाच्या पाणी पातळीने पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters