राज्यात उन्हाचा पारा वाढत असतानाच पावसासाठी पोषक हवामान तयार होती आहे. विदर्भात उद्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील तापमनात चढ-उतार राहणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात ढगाळ हवामान होत असून उन्हाचा पारा ही चढत आहे. मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस, मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व विदर्भात पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून पाऊस पडणार आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Share your comments