महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. जवळ जवळ सगळाच महाराष्ट्र या अतिवृष्टीने प्रभावित झाला.
अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूर परीस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान बऱ्याच गावांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारकडून तात्काळ मदत जाहीर करण्यात आली होती तर आत्ता राज्य मंत्रिमंडळाने 365 कोटी 67 लाख रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलाआहे.
याबाबतची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.या या घोषणेने मध्ये राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करताना निधी विभागानुसार मंजूर केला आहे.
शासनाने मंजूर केलेला विभागनिहाय निधी
- पुणे विभाग- 150 कोटी 12 लाख रुपये
- कोकण विभागासाठी आठ कोटी 51 लाख रुपये
- अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये
- औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये
- नागपूर विभागासाठी दहा कोटी 65 लाख रुपये
- नाशिक विभागासाठी एक लाख रुपये
याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे
Share your comments