1. बातम्या

Monsoon 2022: पडंला रे पाण्या…! मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी, या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

नैऋत्य मोसमी पावसाच्या दमदार आगमनामुळे संपूर्ण भारतात पावसाची तूट गेल्या आठवड्यात 32% वरून 2% वर आली आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात जालशयाच्या पाणीसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने (CWC) देखरेख केलेल्या 143 जलाशयांपैकी 103 जलाशयांमध्ये आजपर्यंत 80% सामान्य साठा नोंदवला गेला आहे. मात्र 19 जलाशयातील पाणीसाठा अजूनही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Monsoon 2022

Monsoon 2022

नैऋत्य मोसमी पावसाच्या दमदार आगमनामुळे संपूर्ण भारतात पावसाची तूट गेल्या आठवड्यात 32% वरून 2% वर आली आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात जालशयाच्या पाणीसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने (CWC) देखरेख केलेल्या 143 जलाशयांपैकी 103 जलाशयांमध्ये आजपर्यंत 80% सामान्य साठा नोंदवला गेला आहे. मात्र 19 जलाशयातील पाणीसाठा अजूनही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, 23 जूनपर्यंत ईशान्येतील पावसाचे प्रमाण 32% पेक्षा जास्त वाढले आहे. जिथे मुसळधार पाऊस अजून सांगितला आहे. भारतीय हवामान खात्या नुसार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे सर्व भाग विशेषत: आसाम आणि मेघालय तीव्र पुराशी झुंज देत आहेत. जूनच्या पावसाने अनेक ठिकाणी त्यांचे पूर्वीचे विक्रम मोडले आहेत. गुरुवारी इंफाळमध्ये 101 मि.मी. पावसाची नोंद झाली. या राज्यात एका दशकात दुसऱ्यांदा 100 मि.मी. पावसाचा आकडा ओलांडला आहे.

उत्तरेकडील ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये जावळपास 77% पावसाची कमतरता दूर केली आहे. व जवळपास 7% जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात मान्सून आधीच दाखल झाला असून या आठवड्यात तो आणखी पुढे सरकेल असा अंदाज आहे. तर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनची प्रगती होऊनही, मध्य भारतात पावसाची कमतरता 33 टक्के आणि दक्षिण द्वीपकल्पात 15 टक्के आहे.

एकूण 36 उपविभागांपैकी, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल समाविष्ट असलेल्या 16 उपविभागांमध्ये अद्यापही कमी पावसाची नोंद आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, पावसाची ही तूट जूनच्या अखेरीस भरून काढली जाईल, कारण येत्या पाच दिवसांत बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सूनचा वेग वाढेल. 6 जुलैपर्यंत मान्सून देशातील बहुतांश भागात पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) देखरेखीखालील 143 जलाशयांच्या साठ्यातही सुधारणा झाली आहे. सध्या ते 49.654 अब्ज घनमीटर आहे, जे एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या 28% आहे. तर एकूण साठवण स्थिती मागील वर्षीच्या (55.645 BCM) पेक्षा कमी आहे. सध्या हे याच कालावधीतील (39.832 BCM) गेल्या 10 वर्षांच्या सरासरी साठ्यापेक्षा चांगले आहे. 143 जलाशयांपैकी 103 जलाशयांमध्ये 80% पेक्षा जास्त तर 40 जलाशयांमध्ये 80% ते 50% जलसाठा नोंदवला गेला आहे.

CWC च्या ताज्या अपडेटनुसार, गंगा, सुवर्णरेखा, तापी, कच्छ, गोदावरी, कृष्णा आणि कावेरीमध्ये सामान्यपेक्षा भारी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. दक्षिणेकडील नर्मदा, महानदी आणि शेजारील नद्या सामान्य स्थितीच्या जवळ आहेत. तर साबरमती, सिंधू आणि माहीमध्ये त्याची तीव्र कमतरता आहे, जी पश्चिमेकडे मान्सूनची संथ प्रगती दर्शवते.

English Summary: Heavy monsoon rains, torrential rains Published on: 24 June 2022, 10:59 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters