महिला सक्षमीकरणासाठी एचडीएफसी बँकेचा नवा प्रोग्राम

12 March 2021 12:48 PM By: KJ Maharashtra
Hdfc bank's smart up unnati program

Hdfc bank's smart up unnati program

भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी स्मार्ट अप उन्नती हा मार्गदर्शक कार्यक्रम देशातील महिला उद्योजकांना मदत कशासाठी सुरू केला आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी या देशातील महिला उद्योजकांना वर्षभर सल्लामसलत करून त्यांच्या व्यवसायातील लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत करणार आहे.एचडीएफसी बँकेच्या शासकीय आणि संस्थात्मक व्यवसाय, ई-कॉमर्स आणि स्टार्ट अप बँकिंगच्या प्रमुख स्मिता भगत यांनी माहिती दिली की,  महिलांना सगळ्या क्षेत्रांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यामध्ये आमचा विश्वास आहे. तसेच महिला सक्षमीकरण यासाठी आम्ही बऱ्याच वर्षापासून सातत्याने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे महिन्याला दहा हजार रुपये कमावण्याची संधी

  महिलांना स्टार्अप सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच ते पुढे म्हणाले की,  कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकेचे वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा महिला उद्योजकांना निश्चित होईल. तसेच यामुळे महिला उद्योजकांचा दृष्टिकोन वाढेल आणि कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा घ्यावा याबाबतीत सल्लामसलत करून त्यांचा व्यवसाय वाढविण्यास मदत होईल. 

 

हेही वाचा : Post Office ची भन्नाट ‘मासिक उत्पन्न योजना’; नावाप्रमाणे महिन्याला मिळतील पैसै

हा प्रोग्राम स्मार्ट अप अपग्रेडेशन प्रोग्राम चा एक भाग असून एचडीएफसी स्मार्टअप  प्रोग्राम से संबंधित तीन हजाराहून अधिक महिला उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.

women empowerment HDFC Bank महिला सक्षमीकरण एचडीएफसी बँक स्मार्ट अप उन्नती Smart up unnati program स्मार्ट अप उन्नती प्रोग्राम
English Summary: HDFC Bank's new program for women empowerment

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.