भारतातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी स्मार्ट अप उन्नती हा मार्गदर्शक कार्यक्रम देशातील महिला उद्योजकांना मदत कशासाठी सुरू केला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी या देशातील महिला उद्योजकांना वर्षभर सल्लामसलत करून त्यांच्या व्यवसायातील लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत करणार आहे.एचडीएफसी बँकेच्या शासकीय आणि संस्थात्मक व्यवसाय, ई-कॉमर्स आणि स्टार्ट अप बँकिंगच्या प्रमुख स्मिता भगत यांनी माहिती दिली की, महिलांना सगळ्या क्षेत्रांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यामध्ये आमचा विश्वास आहे. तसेच महिला सक्षमीकरण यासाठी आम्ही बऱ्याच वर्षापासून सातत्याने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे महिन्याला दहा हजार रुपये कमावण्याची संधी
महिलांना स्टार्अप सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच ते पुढे म्हणाले की, कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकेचे वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा महिला उद्योजकांना निश्चित होईल. तसेच यामुळे महिला उद्योजकांचा दृष्टिकोन वाढेल आणि कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा घ्यावा याबाबतीत सल्लामसलत करून त्यांचा व्यवसाय वाढविण्यास मदत होईल.
हेही वाचा : Post Office ची भन्नाट ‘मासिक उत्पन्न योजना’; नावाप्रमाणे महिन्याला मिळतील पैसै
हा प्रोग्राम स्मार्ट अप अपग्रेडेशन प्रोग्राम चा एक भाग असून एचडीएफसी स्मार्टअप प्रोग्राम से संबंधित तीन हजाराहून अधिक महिला उद्योजकांना याचा फायदा होणार आहे.
Share your comments