1. बातम्या

HDFC Bank ने शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलं ई- किसान धन App


खासगी क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचडीएफसी बँकेने शेतकऱ्यांसाठी एक ऐप लॉन्च केले आहे. या ऐप नाव ई- किसान धन  (e-Kisaan Dhan)  असे ठेवले असून याच्यामाध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.  हे ऐप शेतकऱ्यांचा गरजा लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे.  याच्या मदतीने शेतकरी घरी बसून शेती आणि बँकेच्या संबंधीच्या सेवा  (Banking And Agriculture Services)  घेऊ शकतील.

काय आहे ई- किसान धन App - ई - किसानद्वारे शेतीशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे.  यासह रूरल इकोसिस्टम  Rural Ecosystem ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थेला पूर्ण केले जाणार आहे.  याची एक अजून एक विशेषता आहे की, याच्या माध्यमातून सरकारच्या नव्या योजनांचा कसा लाभ घेता येईल, याची माहिती देखील मिळणार आहे.   हे ऐप शेतकऱ्यांना अनेक वैल्यू एडेड सर्विस देणार आहे.  यात  बाजारातील पिकांना किंवा शेतमालांना असलेल्या भावाची माहिती.  शेतीशी संबंधित नव्या बातम्या आणि माहिती, हवामानविषयी माहिती, बियाणांचे प्रकार आणि त्यांची माहिती. एसएमएस एडवायजरी,  जनावरांच्या बाजाराविषयी, किसान टीव्ही सेवा.  यासह बँकेचे अनेक लाभ आपण घेऊ शकतात.

याच्या माध्यातून आपण कर्जासाठी अर्ज करु शकतात. विमा सेवा, किसान क्रेडिट कार्डशी संबंधित कर्ज सुविधा, बँक खाते उघडण्याची सुविधा.  या ऐपच्या माध्यामातून सरकारच्या सोशल सिक्योरिटी स्कीम्स (Social Security Schemes) चा ही आपण लाभ घेऊ शकतात.  शेतकरी एफडी, आरडी, साठीही आपण या एप्पच्या माध्यमातून अर्ज करु शकता. 

गुगल प्ले स्टोअरमधून करा डाऊनलोड

ई- किसान धन ऐपच्या गुगल प्ले स्टोअरमधून आपण डाऊनलोड करु शकता.  सध्या हे ऐप इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, परंतु लवकरच इतर भारतीय भाषेत येणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. 

या ऐपचे  उद्दिष्ट - प्रत्येक गाव आपले या उद्दिष्टला पुर्ण केले जाणार आहे. ग्रामिण आणि सुविधा कमी असलेल्या परिसरात किंवा भागात ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या बोटांच्या माध्यमातून माहिती मिळावी.   कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजांची पुर्तता करण्यासाठी. या ऐपच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास हे ऐप फायदेशीर ठरेल. देशाच्या प्रगतीसाठी हातभार लागेल असा उद्देश या ऐपला विकसित करण्यामागे आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters