आपण बरेच बँकिंग घोटाळे बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत. या घोटाळ्यामुळे अनेक बँका पार रसातळाला गेल्याचे आपण पाहिले. जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपण ठेवलेला पैसा हा खरंच सुरक्षित आहे की नाही याची चिंता आपल्याला भेडसावत असते. आणि तसे पाहिले तर अशी चिंता करणे हे सहाजिकच आहे.
तसेच बँकिंग फ्रॉड पासून वाचवण्यासाठी वेगळ्या बँक आपल्या ग्राहकांना आणि आरबीआय स्वतःच्या घटनांबद्दल ग्राहकांना सतर्क करत असते. अशा परिस्थितीमध्ये रिझर्व बँकेने अशा तीन बँकांची लिस्ट जाहीर केली आहे की आज त्या बँकांमध्ये पैसे ठेवणे हे सुरक्षित असून तुम्ही या बँका विश्वास ठेवू शकता. यातील बँकांपैकी पहिली बँक हे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे आयसीआयसीआय बँक आणि तिसरे आहे एचडीएफसी बँक. या तिन्ही बँकांपैकी कुठल्या एका बँकेत तुमच्या खात असेल तर ते सुरक्षित आहे असे आरबीआयने जाहीर केले आहे.
आरबीआयने जाहीर केलेल्या डीएसआयबी 2020 ची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीमध्ये आरबीआयने एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक या बँका उत्तम काम करत आहेत. कोणाच्या संकटामध्ये या बँका देशांतर्गत बँका म्हणून पद्धतशीरपणे महत्त्वाच्या काम करत होते. यामुळे बॅंकांमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
डीएसआयबी म्हणजे डोमेस्टिक सिस्तेमिकली इम्पॉर्टंट बँक. याचा अर्थ असा होतो की अशा बँक तिच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. याची यादीमध्ये आरबीआयने वरील तीन बँकांचा उल्लेख केला आहे. ग्राहकांना विश्वास देण्यासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे.
संदर्भ- डेली हंट
Share your comments