1. बातम्या

ऐकलं का ! बँक कर्मचाऱ्यांची मे महिन्यात राहील मज्जा; ग्राहकांनो लवकर पूर्ण करा तुमची कामे

मे महिना खासगी (Private Bank) आणि सार्वजनिक बँक (Government Bank) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे. या महिन्यात बँका एकूण ९ दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुट्यांमुळे ५ दिवस बँका बंद राहतील

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
मे महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या

मे महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या

मे महिना खासगी (Private Bank) आणि सार्वजनिक बँक (Government Bank) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे. या महिन्यात बँका एकूण ९ दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या विविध सुट्यांमुळे ५ दिवस बँका बंद राहतील.

सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे २०२१ मध्ये बँका एकूण ९दिवस बंद राहतील.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार मे २०२१ मध्ये बँक महाराष्ट्र दिन, रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बंद असणार आहेत. यामुळे पुढील महिन्यातील बँकेची कामे पुर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल. नाहीतर बँकांच्या कामांसाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या घालाव्या लागतील.

 

दरम्यान, देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पध्दत ही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्‍यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह अनेक राज्यांतील बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान 15 मे पर्यंत बँका सुरू असतील.

बँकांना का आणि कधी, कुठे - कुठे असतील सुट्ट्या

1 मे – १ मे हा महाराष्ट्र दिनानिमित्त (कामगार दिन) बँका बंद राहतील. या दिवशी बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकत्ता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे बँका बंद असतील.

७ मे – रोजी उमत-उल-विदा च्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

१३ मे – या दिवशी ईद (ईद-उल-फितर) आहे. बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे बँका बंद राहतील.


१४ मे – भगवान श्री परशुराम जयंती, रमजान-ईद, बसवा जयंती आणि अक्षय तृतीया यामुळे आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक. गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, जयपूर, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ, नवी दिल्ली, पाटना, पणजी, रायपूर, रांची, शिलांग आणि शिमला येथील बँका बंद राहतील.

२६ मे – बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद असतील.

रविवारी व्यतिरिक्त दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. २, ९, १६,२३ आणि ३० मे रोजी रविवार आहे, तर ८ आणि २२ मे रोजी दुसरा आणि चौथा शनिवारमुळे बँका बंद असतील.

English Summary: Have you heard Bank employees will be happy in May; Get your work done quickly, customers Published on: 01 May 2021, 10:17 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters