सोशियल मिडियावर शेतकऱ्यांची पोर आता खुपच सक्रिय आहेत, सध्या शेतकरी घसरत्या किमतीमुळे, पाऊसामुळे होणारे नुकसान, सरकारचे शेतकऱ्यांबाबत दुर्लक्ष धोरण ह्या सर्व कारणांमुळे खुपच चिंतेत आहे आणि कसेबसे आपले आणि आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह चालवीत आहे. त्यामुळे सरकारच्या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेतकरी पुत्रांनी गुरुवारी सोशियल मिडीयावर #सोयाबीन हा एक अनोखा ट्रेंड गाजवूनच टाकला.
त्याच झालं असं सोयाबीनचे दर आसमानी भिडत असताना अचानक सोयाबीनच्या दरात पडझड सुरु झाली त्यामुळे शेतकरी पुत्रांचा आक्रोश खुपच पेटला आणि तो सोशियल मिडीयावर व्यक्तही करत होता. पण ह्याला एक वेगळेच वळण आणून दिले ते ब्रह्मा चट्टे यांनी, त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की आपण आपले मत #सोयाबीन ह्या ट्रेंड वर व्यक्त करा आणि त्यांच्या आवाहनला उस्फुर्त प्रतिसाद हा शेतकरी पुत्रांनी दाखवला आणि अक्षरशः गुरुवारी रात्री #सोयाबीन हा ट्रेंड टॉपवर नेऊन पोहचवला.
सोयाबीनच्या दरात अचानक घसरण
सोयाबीन बाजारात आला आणि सर्वांचे आकर्षण त्याकडे वळले कारण असे की येताच मुहूर्ताच्या सोयाबीनला चक्क विक्रमी 11000 रुपये प्रति क्विंटलचा उच्चाँकी दर मिळाला.
पण शेतकरी ह्या सुखद धक्क्याचा आनंद घेणार तेवढ्यातच सोयाबीनचे दर चक्क 2700 रुपयाने घासरले आणि शेतकऱ्यांना एक जोराचा धक्काच बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ह्या धोरणावर शेतकरी खुपच भडकले आणि आपल्या भावना सोशियल मिडियावर व्यक्त करायला लागले. अनेक शेतकरी नेते ह्यावीरुध्द आपला रोष व्यक्त करीत होते, पण एक विशेष गोष्ट ह्यामुळे समजली की आता शेतकरीही सोशियल मिडियावर खुपच सक्रिय आहे आणि तो आपला आवाज ह्या माध्यमातून बुलंद करत राहीन.
सोशियल मिडियाच्या माध्यमातून सरकारची कानउघडणी
#सोयाबीन ह्या ट्रेंडची टॅगलाईन होती ना कुण्या पक्ष्यासाठी तर आपल्या बापाच्या हक्कासाठी ह्याद्वारे शेतकरी पुत्रांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सरकारला जवाब विचारला. सोयाबीनचे दर पडले आणि शेतकरी खुपच आक्रोषित झाला, पण खरा रोष हा सोशियल मिडियावर शेतकऱ्यांच्या पोरांनी व्यक्त केला आणि सरकारची ह्यासंबंधी चांगलीच कानउघडणी केली. सोयाबीनचे रेट पडलेत पण असे असूनही सोयाबीनचे तेलाचे रेट हे चक्क आसमान गाठतायेत, मग ही निव्वळ शेतकऱ्यांची पिळवणूक नाही तर काय आहे…
असा खोचक सवाल आता शेतकरी सरकारदरबारी विचारत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर आपण फक्त आपले पोट भरण्यापुरता उत्पादन घेऊ आणि आपल्या मालाची किंमत काय आहे ते सरकारला दाखवू असे आवाहन देखील केले.
Share your comments