1. बातम्या

हरियाणा सरकारची योजना: आता शेतकऱ्यांना हमीशिवाय मिळू शकतं 1.60 लाख रुपयांचे कर्ज

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली. या कार्डच्या अटी केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेप्रमाणे आहेत. याअंतर्गत गाय, म्हैस, मेंढी, शेळ्या आणि कुक्कुटपालन करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपये उपलब्ध होत असते. यामध्ये 1.60 लाख रुपयांपर्यंत रक्कम घेण्याची कोणतीही हमी दिली जाणार नाही.

भरत भास्कर जाधव

बँकर्स समितीने सरकारला आश्वासन दिले आहे की प्रत्येक पात्र अर्जदाराला पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळेल. ते राज्यातील सुमारे 16 लाख कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे दुभत्या जनावरे आहेत आणि त्यांचे टॅगिंग केले जात आहे.

क्रेडिट मर्यादा:

  • गायीसाठी 40,783 रुपये देण्याची तरतूद आहे.

  • म्हशीसाठी (प्रति म्हैस) 60,249 दिले जातील.

  • शेळ्या आणि मेंढ्यांसाठी 4063 रुपये उपलब्ध

  • कोंबडीला (अंडी घालण्यासाठी) 720 रुपयांचे कर्ज दिले जाईल.

पात्रता:

  • अर्जदार हा हरियाणा राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असावे.
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकार फोटो.

व्याज किती असेल?

बँका सहसा 7 टक्के व्याज दराने कर्ज देतात.पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत, पशुधन मालकांना फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागेल.
केंद्र सरकारकडून 3 टक्के सूट देण्याची तरतूद आहे. कर्जाची रक्कम जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

English Summary: Haryana Government's plan: Farmers Can Now Take a loan of Rs 1.60 Lakh Without Guarantee Published on: 17 September 2021, 10:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters