हरियाणा मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर फळांचे, भाजीपाल्याचे आणि मसाल्यांचे नुकसान झाले तर 15 ते 40 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई मिळेल.
या योजनेमध्ये एकवीस फळे, भाजीपाला वर्गीय पिके आणि मसाला पीक यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाईला सरकारने चार वर्गात विभागणी केली आहे. गुरुवारी कृषिमंत्री जेपी दलाल यांनी मुख्यमंत्री बागवानी विमा योजना या नावाने एक बागवानी पिक विमा योजना पोर्टल ची सुरुवात केली. या पोर्टलच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे पिकांचे होणारे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल.
ओला दुष्काळ, तापमान, पूरस्थिती, ढगफुटी, बंधाऱ्यांचे फुटणे, वादळी वारे व आगीत होणारे पिकांचे नुकसानीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. टोमॅटो, कांदे, बटाटे, फुलकोबी, मटर, कारले, वांगे, हिरवी मिरची, शिमला मिरची, फुलकोबी, मुळा, हळद आणि लसूण तसेच फळ पिकांमध्ये पाच पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला असून या पिकांना नुकसान भरपाई दिली जाईल.
याबाबत बोलताना दलाल यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी मेरी फसल मेरा ब्योरा यामध्ये रजिस्ट्रेशन केले आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना वैकल्पिक राहील. या योजनेच्या माध्यमातून भाजीपाला व मसाला पिकांच्या नुकसान भरपाईपोटी तीस हजार रुपये प्रती एकर, फळांच्या नुकसानीसाठी चाळीस हजार रुपये प्रतिएकर दिले जातील. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा फक्त अडीच टक्के इतका राहील.
नक्की वाचा:केव्हीकेचे उद्दिष्ट माती परीक्षणच महत्व
या नुकसान भरपाई ला चार श्रेणीमध्ये म्हणजे 25, 50, 75 व 100 मध्य विभागण्यात आले आहे. 26 ते 50 टक्के जर नुकसान भरपाई झाली तर नुकसान भरपाई 50 टक्के या दराने भाजीपाला, मसाल्याची पिके यांच्यासाठी पंधरा हजार रुपये, फळपिकांसाठी वीस हजार रुपये तसेच 51 ते 75 टक्के नुकसान झाले तर 75 टक्के दराने म्हणजेच भाजीपाला, मसाल्यांच्या पिकांसाठी 22 हजार पाचशे रुपये प्रति एकर, फळपिकांसाठी
तीस हजार रुपये प्रती एकर आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तर शंभर टक्के दराने भाजीपाला व मसाल्याच्या पिकांसाठी तीस हजार रुपये, फळपिकांसाठी चाळीस हजार रुपये दिले जातील. या योजनेच्या कार्यवाहीसाठी प्राथमिक स्वरूपात दहा कोटी रुपयांची व्यवस्था केली गेली आहे. हे नुकसान भरपाई सर्वेक्षणाच्या आधारावर दिली जाईल.
Share your comments