सध्या शेतकऱ्यांची मुग काढायची घाई चालू आहे जे की शेतकरी वर्ग मुग तोडणी करून बाजारात विकतो, हे मुग बाजारात विकून शेतकऱ्याला जे पैसे येतात त्या पैशातून जो येणारा बैलपोळा सण असतो तो सण साजरी करतात. मराठवाडा मधील शेतकरी वर्गामध्ये हातात पीक आले असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पहिले पीक म्हणजे मुग जे की सध्या मुगाच्या शेंगा तोडण्याची घाई सगळीकडे सुरू आहे, शेतकरी बळीराजा चा बैलपोळा हा सणाचा खर्च भागवणारे पीक म्हणजे मुग या पिकाला ओळखले जाते.
खरीप हंगाम मधील पहिले नगदी पीक :
यावेळी मुग तोडणी सुरु आहे आणि या तोडणीच्या हंगामात पावसाने आपली संत धार चालू ठेवल्यामुळे थोड्याफार प्रमाणात मुग भिजलेला आहे.त्यामुळे मुग उत्पादक शेतकरी वर्गाला मुग उन्हात वाळत घालावा लागत आहे. नांदेड मध्ये मोठ्या प्रमाणात मुग पिकाची तोडणी सुरु आहे. शेतकरी वर्ग सध्या त्यांच्या शेतामध्ये घरच्या सर्वांना घेऊन मुग तोडणी करत असल्याचे चित्र समोर येत आहे. खरीप हंगाम मधील पहिले नगदी पीक शेतकऱ्याच्या हातात आले असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तसेच बाजारात सुद्धा एक नवचैतन्य दिसणार आहे.
हेहि वाचा :यंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट
दरवर्षी मान्सून च्या अनियमितपणामुळे मागील तीन वर्षांपासून मुगाचे पीक पाहिजे असे प्रमाणात नीट येत नाही मात्र यावर्षी मुगाच्या उत्पादनात घट जरी झाली असली तरी पीक आल्यामुळे यावेळी शेतकरी समाधानी दिसत आहे.मागील काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जे की नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.किनवट तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे नुकसान झाले आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचे पीक सुद्धा पाण्याखाली बुडाले आहे, त्यामुळे त्या भागातील शेतकरी थोड्या प्रमाणात चिंतेत आहेत.
मात्र मुग या पिकाचे यावेळी बऱ्यापैकी उत्पादन निघाले असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि येणारे जे सण आहेत त्या सणाला लागणार खर्च मुग पिकातून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे.मात्र काही भागात पाऊस झाल्यामुळे मुगाचे पीक थोड्या प्रमाणात भिजले गेले आहे त्यासाठी शेतकरी वर्ग थोड्या प्रमाणात जो भिजलेला मुग आहे तो उन्हात वाळत घातलेला आहे.
Share your comments