नवी दिल्ली : कुणाच्या शेतात काय पिकतं किंवा कोणता शेतकरी काय पिक घेतोय याची अचूक माहिती सहजासहजी मिळणं तसं कठिक काम आहे. मात्र, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अधिकाऱ्यांना ‘मेरी फसल-मेरा ब्यौरा’ (Meri Fasal Mera Byora) या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या पिकांची सर्व माहिती भरण्याचे आदेश दिलेत.
विशेष म्हणजे एखाद्या शेत जमिनीत काहीही पिक नसेल ते शेत रिकामं असेल तर त्याचीही माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. हरियाणा शेतकरी कल्याण प्राधिकरणाच्या बैठकीत खट्टर यांनी हे निर्देश दिलेत. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री खट्टर यांना सांगितले. “सध्या राज्यात 92 लाख एकर जमिनीची (Farm Land) नोंद आहे. त्यातील जवळपास 68 लाख जमिनीवर शेती केली जाते.” यावर खट्टर यांनी उरलेल्या 24 लाख एकर शेतीवर काय आहे, त्या शेतीचा उपयोग कशासाठी होतोय याची माहिती जमा करण्यास सांगितलंय. ‘मेरी फसल-मेरा ब्यौरा’ योजनेत पिकांच्या नोंदीची ठोस पद्धत असावी. जेणेकरुन भविष्यात शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यावर देता येईल, असंही खट्टर म्हणाले.
मनोहर लाल खट्टर म्हणाले, “केवल शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणं कठिण आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी फुल शेती, पशुपालन आणि मत्स्यपालन सारख्या शेतीशी संबंधित जोडधंद्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. सुरुवातीला सोनीपत, झज्जर, गुरुग्राम आणि फरीदाबाद या 4 जिल्ह्यांसाठी योजना तयार कराव्यात. जेणेकरुन स्थानिक गरजेनुसार शेती करता येईल.”
शेतकरी कल्याण प्राधिकरणाचं काम काय?
मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, “हरियाणा शेतकरी कल्याण प्राधिकरणाचं काम शेतकऱ्यांचं कल्याण करणाऱ्या आणि त्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या योजनांची देखरेख करणं हे आहे. या योजना योग्य पद्धतीने राबवल्या जातील यासाठी नियोजन करणे. या अंतर्गत भूमिहीन शेतकऱ्यांसह इतर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी काही योजना संबंधित विभागाच्या लक्षात आणून देणं, सूचना करणं अशीही कामं हे प्राधिकरण करते.
Share your comments