भारतात पारंपरिक पिकांची लागवड अजूनही केली जात आहे ह्या पारंपरिक पिक पद्धट्टीमुळे शेतकऱ्यांना हवा तेवढा मोबदला मिळत नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती ही आहे तशीच आहे. पारंपारिक पद्धत्तीने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च देखील काढणे मुश्किलीचे होत आहे. म्हणुन पारंपारिक पिक पद्धत्तीला शेतकऱ्याने फाटा देवा आणि नकदी पिकांची लागवड करावी तसेच फळबाग पिकांची लागवड करावी ह्यासाठी देशात अनेक राज्य सरकारे प्रयत्न करत आहेत.
शासन वेळोवेळी शेतकऱ्यांना ह्यासाठी आवाहन करत असते शिवाय प्रोत्साहन देत असते. तरीही शेतकरी फळबाग लागवड जास्त प्रमाणात करत नाहीत त्यामुळे हरियाणा सरकारने ह्यावर एक उपाययोजना आखली आहे. हरियाणा सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. एक शेतकरी 10 एकर क्षेत्रातील फळबागसाठी अनुदान घेण्यास पात्र असेल.
भाजपा शासित हरियाणा सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेरू फळाची बाग लावण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 11,500 रुपये, लिंबूच्या बागांसाठी 12 हजार रुपये आणि आवळा बागांसाठी एकरी 15 हजार रुपये प्रोत्साहन दिले जाईल.
म्हणजेच जर शेतकऱ्यांकडे 10 एकर क्षेत्र असेल आणि तो त्या क्षेत्रात पूर्ण फळबाग लागवड करेल तर त्याला, पेरूच्या बागा लावण्यासाठी 1,15,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळेल तसेच लिंबूची बाग लावण्यासाठी 1,20,000 आणि आवळा बागेच्या लागवडीसाठी 1,50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल.
तसेच चिकूच्या बागा लावण्यासाठी देखील हरियाणा सरकार एकरी 9080 रुपये अनुदान देणार आहे आणि जास्तीत जास्त अनुदान हे 90,800 रुपये एवढे असणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त 10 एकर क्षेत्रावर अनुदान मिळणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार चिकू लागवडीसाठी 18160 रुपये लागवडीचा खर्च येतो त्यावर 50 टक्के अनुदान हरियाणा सरकार देणार आहे. ह्या योजनेसाठी हरियाणा राज्यातील शेतकरी सरकारच्या फलोत्पादन पोर्टलवर अँप्लाय करू शकतात.
हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आंबा लागवडीसाठी देखील अनुदान दिले जात आहे. आंबा लागवडीसाठी जास्तीत जास्त अनुदान हे 51000 रुपये मिळणार आहे. म्हणजे एकरी 5100 रुपये अनुदान हरियाणा सरकार आंबा लागवडीसाठी देणार आहे. ह्या योजनेचा हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असे सांगण्यात येत आहे.
माहितीस्रोत-टीव्ही9भारतवर्ष
Share your comments