यंदाच्या वर्षी अनेक संकटाचा सामना करत हापूस आंबा मुंबई च्या मार्केट मध्ये दाखल झालेला आहे. देशातील बाजारपेठा खुल्या झाल्या असल्यामुळे आंबा हळू हळू आपले आगमन करत आहे मात्र परदेशात मागील दोन वर्षांपासून आंबा गेला नसल्याने नागरिक आंब्याच्या चवीपासून वंचित राहिले आहेत. पण यंदा अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हापूस अमेरिकेत दाखल होणार आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आयात मार्ग बंद करण्यात आला होता मात्र कृषी विभागाने परवानगी दिली असून आता अमेरिकेतील नागरिकांना हापूस ची चव चाखता येणार आहे.
आंबा निर्यातीचा दुहेरी फायदा :-
राज्यातील आंबा प्रेमी जसे आंब्याची वाट पाहत असतात त्याप्रमाणे अमेरिकेतील नागरिक सुद्धा आंब्याची वाट दोन वर्षांपासून पाहत आहेत. अखेर केंद्र सरकारने याबाबत मार्ग खुला करून आंबा उत्पादक वर्गाला दिलासा दिलेला आहे. मागील दोन वर्षांपासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता बाजारपेठ खुल्या केल्याने आंबा बागायतदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळाली आहे. बाजारात वाढती मागणी आणि उत्पादनात घट असल्यामुळे शेतकऱ्याना दुहेरी फायदा भेटत आहे.
यामुळे बंद होती निर्यात :-
दरवर्षी देशातून सुमारे १ हजार टन आंबा अमेरिकेत पाठवला जातो जे की त्यामध्ये ३०० टन एकटा हापूस असतो परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्यामुळे देशांतर्गत सुद्धा आंब्याची निर्यात बंद होती. अमेरिकेतील कृषी विभागाला आंब्यावर तपासनी करणे शक्य न्हवते त्यामुळे २०२० पासून निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. मार्च २०२२ पासून निर्यातीला सुरुवात होणार असल्याचे सांगितले गेले आहे.
असा सुटला निर्यातीचा प्रश्न :-
आंबा निर्यात करण्यासाठी अमेरिकेतील कृषी विभागाची संमती लागते मात्र कोरोनामुळे सर्व थांबले होते. २०२१ च्या नोव्हेंबर मध्ये भारत व अमेरिका व्यापार मंचाची बैठक पार पडली यामध्ये आयात निर्यातीबाबत चर्चा झाली. याचा सर्वात जास्त फायदा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना च होणार आहे कारण हापूस ची सर्वात जास्त निर्यात महाराष्ट्रातूनच होते.
Share your comments