1. बातम्या

देवगडचा हापूस पुणे मार्केट यार्डात खातोय भाव! एक आंबा विकला गेला तीनशे रुपयाला

हापूस आंबा म्हटले कि सर्वप्रथम आठवतो तो कोकणचा परिसर, कोकणची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचा हंगाम सरत्या फेब्रुवारीपासून सुरू होत असतो. कोकणातील देवगड हापूस जरी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेत हजेरी लावत असतो, तरी देखील हंगामाच्या आधीच या आंब्याची थोडीफार आवक बाजारपेठेत दर वर्षी बघायला मिळत असते. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्ड बाजारपेठेत देवगडचा हापूस आंबा शुक्रवारी नजरेस पडला. शुक्रवारी हापूस आंब्याची एक पेटी बाजारपेठेत विक्रीसाठी आणली गेली होती. यावेळी देवगडच्या हापूस आंब्याला चांगला विक्रमी दर मिळाला, तब्बल अठरा हजार रुपये पाच डझनच्या एका पेटीसाठी दर प्राप्त झाला म्हणजे एक आंबा साधारणतः तीनशे रुपये किमतीने विकला गेला.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Hapus Mango

बाजारपेठ देवगड हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे हे समजताच बाजार समितीचे प्रशासक श्रीमान गरड यांच्या हस्ते या पेटीचे पूजन देखील केले गेले. देवगडच्या हापूस आंब्याची पेटी बाजारपेठेतील प्रमुख आडते रावसाहेब कुंजीर यांनी तब्बल अठरा हजार रुपये दराने खरेदी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते, यावर्षी देखील तालुक्यात हापूस आंब्याचे बऱ्यापैकी उत्पादन मिळणार असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. देवगड तालुक्यातील मौजे कुणकेश्वर कातवण येथील रहिवासी शेतकरी रामभाऊ सावंत हे देखील हापूस आंब्याचे यशस्वी उत्पादन घेत असतात, रामभाऊ यांनी शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्डात हापूस आंब्याची एक पेटी विक्रीसाठी आणली.

मागील दोन वर्षापासून कोरोना नामक महाभयंकर आजारांमुळे हापुस आंब्याच्या विक्रीसाठी अनेक अडचणी येत होत्या. बाजारपेठा बंद असल्याने मागील दोन वर्षापासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र यावर्षी कोरोनाव्हायरस चे संकट संपुष्टात येताना दिसत असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बक्कळ उत्पन्न प्राप्त होण्याची आशा आहे. 

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते यावर्षी हापूस आंब्याचे दर्जेदार उत्पादन प्राप्त होणार आणि त्यामुळे गेल्या दोन वर्षांचे नुकसान भरून काढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: Hapus mango sold for 300 rupee per piece Published on: 22 January 2022, 06:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters