1. बातम्या

लेट पण थेट! कोल्हापूरच्या बाजारपेठेत उशिरा चमकलेला हापूस बाजारपेठेत खातोय भाव; हापूसला विक्रमी दर

कोकणची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचे कोल्हापूरच्या बाजारपेठेत दर्शन झाले आहे. हापूस आंब्याच्या बाजार भावात कायमच तेजी बघायला मिळते. यंदा हापूसच्या बागांवर निसर्गाची अवकृपा कायम राहिली आहे मात्र असे असले तरी हापूस आंबा सध्या रुबाबात कोल्हापूरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. यापूर्वी मुंबईच्या एपीएमसीमध्ये हापूसचे सर्वप्रथम आगमन झाल्याचे नमूद करण्यात आले होते. कोकणची शान हापूस कोकणातून निघून आता देशातील महत्त्वपूर्ण बाजारात एन्ट्री घेत आहे. मध्यंतरी बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला होता, मात्र विपरीत परिस्थितीवर मात करत शेतकरी बांधवांनी हापूसची जोपासना केली आहे आणि आता हापुस बाजारपेठेत बघायला मिळत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Hapus Mango

कोल्हापूरच्या बाजारपेठेत हापुस दाखल होताच चर्चेचा विषय बनला आहे. बाजारपेठेत मुहूर्ताच्या हापूसला विक्रमी दर प्राप्त झाला आहे. पाच डझन हापूस आंब्याची एक पेटी तब्बल 40 हजार 599 रुपयाला विकली गेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ एक आंबा चक्क 676 रुपयाला विक्री झाल्याचे समजत आहे. कोकणातील देवगड हापूस आंब्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. अनेक आंबा प्रेमी देवगडच्या या राजाची आतुरतेने वाट पाहत होते, मात्र वातावरणात प्रतिकूल बदल झाल्यामुळे हापूस आंब्याची बाजारपेठेत उशिरा रवानगी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. असे असले तरी, उशिरा आलेल्या हापूस आंब्याला दराचा विचार न करता आंबा प्रेमींनी खरेदी केल्याचे चित्र कोल्हापूर बाजारपेठेत बघायला मिळाले. हापूस आंबा जगात आपल्या चवीमुळे एक वेगळे स्थान ग्रहण करतो. कोल्हापूरच्या खवय्यांना देखील हापूसची चव भुरळ पाडते. 

कोल्हापूरच्या एपीएमसी मध्ये कोकणातून तसेच कर्नाटक मधून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक बघायला मिळत असते. या वर्षी कोल्हापूरच्या एपीएमसीमध्ये हापूस आंब्याची लेट एन्ट्री असली तरी विक्रमी दर भेटल्यामुळे ती थेट असल्याचे सांगितले जात आहे. कोकण किनारपट्टीतुन म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग देवगड मालवण या भागातून मोठ्या प्रमाणात हापूस कोल्हापूरच्या एपीएमसीमध्ये विक्रीसाठी आणला जात असतो. कोकणातील रत्नागिरीचा हापुस इतर हापूसच्या तुलनेत आकाराने छोटा असतो मात्र याची चव कोल्हापूरच्या खवय्यांना विशेष आकर्षित करते म्हणून दरवर्षी कोल्हापूरचे खवय्ये मोठ्या प्रमाणात रत्नागिरीच्या हापूसची आतुरतेने वाट पाहत असतात. 

या हंगामात सर्वप्रथम मुंबई एपीएमसीमध्ये देवगडचा हापूस नजरेस पडला आणि तदनंतर हा हापूस थेट कोल्हापुरात दाखल झाला आहे. कोल्हापुरात हापूसचे आगमन थोडे उशिरा झाले मात्र मुहूर्ताच्या एका पेटीला तब्बल 40 हजार 599 रुपयाला एक पेटी विकली म्हणजे मुहूर्ताला एक आंबा 676 रुपयाला विकला गेला हा दर मागच्या वर्षीपेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे, गत वर्षी मुहूर्ताचा एक आंबा 625 रुपये प्रमाणे विक्री झाला होता.

English Summary: hapus mango get highest rate in kolhapur apmc Published on: 10 February 2022, 01:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters