1. बातम्या

मुंबईच्या बाजारपेठेत अवतरणार क्युआर कोडधारक हापूस आंबा

सध्या बाजारामध्ये हापूस आंब्याची कर्नाटक आंब्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी जीआय प्राप्त बागायतदारांना फळांवर लावण्यासाठी क्यू आर कोड वितरित करण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन बागायतदारांना प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी दहा हजार क्युआर कोड देण्यात आले आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
हापुसमधील भेसळ रोखण्यासाठी क्यूआर कोड

हापुसमधील भेसळ रोखण्यासाठी क्यूआर कोड

सध्या बाजारामध्ये हापूस आंब्याची कर्नाटक आंब्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी जीआय प्राप्त बागायतदारांना फळांवर लावण्यासाठी क्यू आर कोड वितरित करण्यात आले आहेत. प्रत्येकी दोन बागायतदारांना प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी दहा हजार क्युआर कोड देण्यात आले आहेत.

कोकणचा आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे ग्रामीण व्यापारी जिल्ह्यातील आंबा हापूस नावाने बाजारात दाखल होतो. यांच्यामध्ये जीआय सर्टिफिकेट हे कोकण हापूस आंबा उत्पादकआणि विक्रेते सहकारी संस्था, केळशी आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ आणि कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत बागायतदारांना दिले जाते. आतापर्यंत जर विचार केला तर कमीत कमी 800 हून अधिक बागायतदार, प्रक्रियादार आणि व्यवसायिकांनी सर्टिफिकेट घेतले आहे.

 

कर्नाटक आंब्यात होणारी भेसळ रोखण्यासाठी संबंधित संस्थांनी हा पायलट प्रकल्प हाती घेतला आहे. या दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन केला तर संबंधित फळाचे सविस्तर माहिती वेबसाईटवर मिळते. जस  की संबंधित फळ कोणत्या शेतकऱ्याच्या बागेतून आले आहे,  त्याचा वापर करता कोण, जी आय सर्टिफिकेट आहे का, फळामधील न्यूट्रिशन कोणती याबाबत सविस्तर माहिती त्यात मिळते.

क्यूआर कोडचा स्टिकर लावलेला आंबा दोन दिवसात नवी मुंबईतील बाजारात दाखल होत आहे. याबाबत कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे म्हणाले यंदा क्यूआर कोडची एक लाख स्टिकर तयार करण्यात आले आहेत.

त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती जी आय च्या  सॉफ्टवेअर मध्ये फीड  केले जाईल.  यामाध्यमातून अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा हे लोकांना सहजरीत्या कळणार आहे.

सौजन्य- ॲग्रोवन

English Summary: Hapus Mango, a QR code holder, will be launched in the Mumbai market Published on: 20 April 2021, 06:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters