1. बातम्या

हापूस आंब्याला मिळाले भौगोलिक मानांकन

नवी दिल्ली: फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहिर झाले आहे. केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने आज मानांकनाची अधिकृत घोषणा केली. या मानांकनामुळे हापूस आंब्याची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन जाहिर झाले आहे. केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने आज मानांकनाची अधिकृत घोषणा केली. या मानांकनामुळे हापूस आंब्याची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व लगतच्या परिसरातील हापूस आंब्यास हे मानांकन  जाहिर करण्यात आले आहे, हे भौगोलिक मानांकन अशा उत्पादनांवर वापरले जाणारे चिन्ह आहे, ज्यामध्ये त्या उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता ही त्याच्या मूळ भौगोलिक स्थानावरुन ओळखली जाते. हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कोकणातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला या भौगोलिक मानांकनामुळे बळकटी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहान विभागाने हापूस आंब्यास हे मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. नुकतेच केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी भौगोलिक मानांकनाचा लोगो व टॅगलाईनचे अनावरण केले होते.  

हापूसला कायद्याचे कवच

या मानांकनामुळे कोकण आणि लगतच्या भागातील आंबे वगळता इतर कोणत्याही आंब्यांना हापूस असे संबोधता येता येणार नाही किंवा त्यांची विक्री करताना हापूस असा उल्लेख करता येणार नाही. याआधी हापूस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जायचा. यामुळे ग्राहकांची फसवणूक तर व्हायचीच तसेच कोकणातील हापूस उत्पादकांचेही नकुसान व्हायचे. त्यावर कायदेशीर कारवाही करणे शक्य होत नव्हते. हापूस आंब्याला आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.

संयुक्त अरब अमिराती हापूसचा सर्वाधिक चाहता

कोकणच्या हापूस आंब्यास विदेशात सर्वाधिक मागणी आहे. सन 2018-19 या वर्षात परदेशात 26 हजार 937 मेट्रिक टन आंबा महाराष्ट्रातून निर्यात करण्यात आला होता. यामध्ये सर्व प्रकारच्या आंब्यांचा समावेश होता. हापूसला सर्वाधिक मागणी ही संयुक्त अरब अमिरातीतून आहे. यावर्षी या भागात 13 हजार 984 मेट्रिक टन आंबा निर्यात केला गेला, यापैकी 60 टक्के आंबा हा हापूस होता. हापूसला जगभरातील इंग्लड, ओमान, कतार, कुवैत, सौदी अरेबिया, कॅनडा, फ्रान्स, सिंगापूर, जर्मनी, बहरीन, हॉगकाँग या देशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. इंग्लंडमध्ये यावर्षी 3310 मेट्रिक टन आंबा निर्यात केला गेला, यामध्ये 40 टक्केहुन अधिक हापूस आंब्याचा समावेश होता. हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे आता हा आंबा निर्यात करताना हापुस या नावाने निर्यात केला जाईल, यापूर्वी भारतीय आंबा या नावाखाली निर्यात होत होती. या मानांकनामुळे जागतिक बाजारपेठेत हापूस आंब्याची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

महाराष्ट्रातील 31 उत्पादनांना भौगोलिक मानांकन

देशातील 325 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 31 उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनात सोलापुरी चादर, सोलापुरी टॉवेल, उपडा जमदानी साडी, पुणेरी पगडी, पैठणी साडी,  महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नासिकची द्राक्षे, वारली पेंटींग, कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदुळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तुरडाळ, आंबेमोहर तांदूळ, वेंर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणु घोळवड चिक्कु, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळगावचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री, करवत काटी साडी आणि आता कोकणच्या हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.

English Summary: Hapus Alphonso mangoes get Geographical Indication tag Published on: 05 October 2018, 09:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters