1. बातम्या

वाढदिवस माझ्या सर्जाचा!! मोठ्या मनाच्या शेतकऱ्याने केले गावभर सेलिब्रेशन, शेतकऱ्याची राज्यात चर्चा..

शेतकऱ्यांना अनेक कामात मदत करणारा त्याचा सर्जा म्हणजेच बैल हा त्याला जीवापेक्षा प्रिय असतो, अनेकदा त्याची प्रचिती येत असते. आधुनिक काळात या बैल जोडींची संख्या जरी कमी झाली असली तरी प्रेम आणि जिव्हाळा कायम आहे, याची प्रचिती नुकतीच आली.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar

farmar

शेतकऱ्यांना अनेक कामात मदत करणारा त्याचा सर्जा म्हणजेच बैल हा त्याला जीवापेक्षा प्रिय असतो, अनेकदा त्याची प्रचिती येत असते. आधुनिक काळात या बैल जोडींची संख्या जरी कमी झाली असली तरी प्रेम आणि जिव्हाळा कायम आहे, याची प्रचिती नुकतीच आली. सध्या अमरावतीमध्ये चर्चा आहे ती सर्जाच्या वाढदिवसाची. शेतकरी जरी जगाचा पोशिंदा असला तरी त्याचा पोशिंदा असलेल्या सर्जाचा वाढदिवस आणि तो ही अल्पभूधारक (Farmer) शेतकऱ्याने साजरा केला आहे. याचीच जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील घोडचदि शहीद येथील दिलीप दामोदर वडाळा हे गेल्या आठ वर्षापासून सर्जाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत. यावेळी तर त्यांनी सर्जाचा वाढदिवस साजरा करुन एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. यामुळे शेतकऱ्याचे आपल्या बैल जोडीवर किती प्रेम असते हे दिसून येते. मशागतीपासून ते पेरणीपर्यंतची कामे ही बैलांवरच अवलंबून आहेत अल्पभूधारक असतानाही केवळ बैलांमुळे उत्पादनात वाढ झाली आणि आर्थिक परस्थिती सुधारली असल्याचे दिलीप वडाळ यांनी सांगितले आहे.

सर्वकाही बैल जोडीमुळेच शक्य झाले असून वाढदिवस साजरा करुन त्याच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येते म्हणून हा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण बघतो की अनेक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना अनेक उपक्रम राबवले जातात. मात्र ते माणसांबाबत असतात. आपल्या सर्जाचा वाढदिवस पवित्र ठिकाणी व्हावा ही मनीषा दिलीप वडाळ यांची इच्छा होती.

त्यानुसार पिंपळोद परिसरातील परमपूज्य परशराम महाराज यांचे झीरा येथे मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते तर वाढदिवसाचे निमित्त साधून वडाळ परिवाराने यावेळी अन्नदानाचा उपक्रम केला. यावेळी अनेक शेतकरी देखील उपस्थित होते. यामुळे जिल्ह्यात याचीच चर्चा रंगली आहे. वाढदिवस सर्जा या बैलाचा असला तरी शेतकरी दिलीप वडाळ यांचा उत्साह सगळं काही सांगत होता. यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करीत होते. गेल्या आठ वर्षापासून ते बैलजोडीचा सांभाळ करीत आहेत. या बैलजोडीचा सांभाळ ते पोटच्या मुलाप्रमाणे करीत आहेत.

English Summary: Happy Birthday to my creator !! Big-hearted farmer did village-wide celebration, discussion of farmers in the state .. Published on: 06 March 2022, 11:30 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters