1. बातम्या

Fishing Update : कोकणात मासेमारीसाठी समुद्रात निम्म्याच नौका; पाहा नेमकं काय आहे कारण

मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी नौकांची दुरुस्ती करावी लागते. पण पर्ससीन नौका दुरुस्ती करणाऱ्या कामगारांची कमतरता भासत असल्याचे मच्छिमारांकडून सांगितले जात आहे.

fishing in Kokan News

fishing in Kokan News

Ratnagiri News 

पावसाळी मासेमारी बंद झाल्यानंतर आता पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. मात्र असे असेल तरी अद्याप मात्र 50 ते 60 टक्के नौकाच मासेमारी करण्यासाठी समुद्रात जात असल्याचे पाहायला मिळत आहेत, असे वृत्त मराठी वृत्तवाहिनी टीव्ही 9 दिले आहे.

मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी नौकांची दुरुस्ती करावी लागते. पण पर्ससीन नौका दुरुस्ती करणाऱ्या कामगारांची कमतरता भासत असल्याचे मच्छिमारांकडून सांगितले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर मच्छीमार बांधवांच्या नौका दुरुस्तीसाठी कारागीर मिळत नसल्यामुळे मच्छीमारांसमोर मोठी समस्या निर्माण होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत.

पावसामुळे तीन महिन्यांपासून कोकणात मासेमारी बंद होती. 1 सप्टेंबरपासून पुन्हा कोकणात मासेमारीला सुरुवात झाली आहे. खरंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते. मात्र पर्सनेट, फिशिंग ट्रॉलर यांना मासेमारीसाठी 1 सप्टेंबरची वाट पाहावी लागते. ती प्रतिक्षा आता संपली असून आजपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत.

दरम्यान, गावातील पारंपरिक शेतीपेक्षा काही वेगळे करून पाहिल्यास अधिक चांगले काम करता येईल. या उद्देशाने मत्स्यपालन सुरू केले आणि त्याचे परिणामही मिळत आहेत. पहिल्या वर्षी 3 लाख रुपये कमावले, दुसऱ्या वर्षी कमाई 5 ते 8 लाख रुपये झाली असून यंदा मोठ्या प्रमाणात मासे पाळले आहेत. यामुळे ऑक्टोबरपासून पुढील 3 महिन्यांत 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

English Summary: Half of the boats in sea for fishing in Kokan See what exactly is the reason Published on: 05 September 2023, 01:45 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters