यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही अवकाळी पावसाने झाली आहे, नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. अवकाळी गारपीट व वातावरणात झालेला बदल यामुळे रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसत आहे.गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यात हवामान कोरडे झाले असल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे, मात्र हवामान जरी कोरडे असले तरी संकट अजून टळलेले नाही असेच नजरेस पडत आहे. सध्या राज्यात तापमानात अंशता घट नमूद करण्यात आली आहे, असे असले तरी राज्यात गारठा अद्यापही कायम आहे.
भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवसात राज्यात पुनश्च एकदा वरुणराजा हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच यावेळी गार सोबत घेऊन बरसणार असल्याचे सांगितलं जातं आहे. राज्यातील खानदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उद्या आणि परवा दाट धुके पडणार असल्याचे सांगितले जात आहे, तसेच 21 व 22 तारखेला खानदेश प्रांतासह विदर्भात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. आधीच विदर्भात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी राजा पूर्णता हतबल झाला आहे आणि परत विदर्भात गारपीटीची शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळे विदर्भातील शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
विदर्भात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते, त्यामुळे हवामान खात्याने जारी केलेला हा अंदाज शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखी सिद्ध होत आहे. राज्यातील खानदेश प्रांतात आगामी काही दिवस दाट धुके पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकाला मोठा फटका बसू शकतो, शिवाय यामुळे इतरही रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. खानदेश मधील धडगाव, अक्कलकुवा, अकराणी, शहादा, शिरपूर, चोपडा, रावेर, यावल या तालुक्यात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे आणि या तालुक्यात आगामी दोन दिवस दाट धुके पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच विदर्भातील जामोद, धामणी, चिखलदरा या तालुक्यात देखील आगामी दोन वातावरणात मोठा बदल होणार असून दाट धुके सर्वत्र नजरेस पडेल आणि तसेच 21 व 22 तारखेला खानदेश समवेतच या भागात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Share your comments