देशात एकीकडे कोरोनासारखे संकट तर दुसरीकडे पुर्वमोसमी पावासामुळे ओढवणारे पिकांवरील संकट यात शेतकरी अडकला आहे. पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवमान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागांसह देशातील इतर राज्यातही गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान राज्यात उन्हाचा चटकाही कायम असल्याने सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वाशीम येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा हा चाळीशीच्या पार होता. यासह मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, मराठवाड्यातील, परभणी येथेही चाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. बंगालच्या उपसागरच्या दक्षिण भागात असलेल्या अंदमान समुद्रात गुरुवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन ही प्रणाली उत्तरेकडे सकरणार आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अंदमान निकोबार बेटसमुह, म्यानमारमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे. पडणाऱ्या पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचे नुकसान होत आहे. देहराडूनमधील गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. येथील ३५ टक्के गहू सडकण्याची स्थितीत आहे. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांची स्थितीही काही वेगळी नाही. पुढील महिन्याची सुरुवात ही पावसाने होणार आहे. दरम्यान येथे आज पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Share your comments