स्व. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रातील नाविण्यपूर्ण शेतीकरीता कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सम्मान केला जातो. विदर्भस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार २०२१ करीता उत्कृष्ट हवामान शास्त्रज्ञ म्हणून अनिल मधुकर बंड, उत्कृष्ट कृषि विद्यार्थी निखील रमेशराव यादव, महेंद्र ढवळे रेशीम उद्योग अधिकारी यांची निवड या पुरस्काराकरीता झाली असता आज २१ मे रोजी त्यांच्या रेशीम पार्क च्या बांधावर हा पुरस्कार यां तिघांना देऊन गौरवान्वीत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ पंजाबराव देशमुख, स्वर्गीय राजीव गांधी तसेच नुकतेच आपल्यास सोडून गेलेले युवा व्यक्तिमत्त्व मा. खासदार राजीव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तसेच राजीवजी यांना सगळ्यांनी श्रद्धांजली सुधा अर्पित केली. या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात मा. प्रकाश दादा साबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण सोबत केली. तेव्हा त्यांनी पुरस्कारांची पार्श्वभुमी व पारदर्शीता सगळ्यांना दर्शवून दिली. यानंतर विविध मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
त्यामध्ये निवड समितीच्या अध्यक्ष पौर्णिमा ताई सवाई यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. या नंतर गुरू शिष्य जोडी बंड सर, ढवळे सर, तसेच कृषि विद्यार्थी निखिल यादव या तिघांचा सत्कार शाल, श्रीफळ, ट्रॉफी देवून करण्यात आला. यापुढे सुधा आपले हे कार्य आम्ही शेतकरी हितार्थ सुरू ठेवू यांची ग्वाही तिघांनी दिली. तसेच या मध्ये एक कौतुकाची गोष्ट म्हणजे निखिल यादव तसेच ढवळे साहेब हे बंड सर याचे विद्यार्थी होय. याप्रकारे सगंळ्या नियमांचे पालन करून राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार देण्यात आला.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Share your comments