काल गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि दक्षिण उडीसा मधील कलिंगपट्टम ते गोपाळपूर मध्ये धडकल्यानंतर या चक्रीवादळाचा वेग काहीसा कमी झाला आहे.त्याचे रूपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.
हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.या दोन्ही भागातील जवळ जवळ सात जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या सात जिल्ह्यांमध्येठाणे,पालघर,रत्नागिरी,जळगाव, धुळे आणि जळगाव मध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी ची शक्यता आहे. या मध्ये काही ठिकाणी 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सोबतच मुंबई, औरंगाबाद आणि पुण्यासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये काही ठिकाणी 64 मी ते 200 मी मी पर्यंत पावसाचा अंदाज असेल मी मी पर्यंत.ज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील रायगड,ठाणे, पालघर,धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना उद्या दिनांक 28 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे.सोबतच नाशिक, पुणे, रत्नागिरी,औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार दिनांक 29 पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Share your comments