1. बातम्या

'ह्या' राज्यातील शेतकऱ्यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी सरकार देणार 1500 रुपये, जाणुन घ्या काय आहे माजरा

आधुनिक युगात शेती हि बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या काळानुसार शेती हि बदलत चालली आहे, आता शेती हि पूर्णतः आधुनिक व हायटेक झाली आहे. शेती मध्ये यशस्वी होण्यासाठी आता हायटेक उपकरणाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आपल्या शेतकऱ्यांना हायटेक करण्यासाठी अनेक योजना राबवित असतात, ह्या योजनाद्वारे सरकारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
smartphone

smartphone

आधुनिक युगात शेती हि बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या काळानुसार शेती हि बदलत चालली आहे, आता शेती हि पूर्णतः आधुनिक व हायटेक झाली आहे. शेती मध्ये यशस्वी होण्यासाठी आता हायटेक उपकरणाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे आपल्या शेतकऱ्यांना हायटेक करण्यासाठी अनेक योजना राबवित असतात, ह्या योजनाद्वारे सरकारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात

शेतीमध्ये आधुनिक टेक्निकचा वापर हा शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे, आधुनिक टेक्निकमुळे व हायटेक साधनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे शिवाय पिकांचे उत्पादन व क्वालिटी यामुळे अजूनच चांगली होत आहे. ह्या बदलत्या काळात व आधुनिक तंत्रामुळे शेतकऱ्यांना आपला माल विक्री करायला अधिक सोपे झाले आहे. हिंदुस्थानातील शेती हि ड्रोन व मोबाईलमुळे अधीकच हायटेक बनत चालली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न साहजिक वाढले आहे. बदलत्या काळाला अनुरूप शेतकऱ्यांना हायटेक बनवले जात आहे यासाठी सरकारे अनेक योजना राबवित आहेत व शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. शेतकऱ्यांना स्मार्ट आणि हायटेक बनवण्यासाठी असाच एक प्रयोग गुजरात सरकारने सुरु केला आहे. शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे व त्यातून त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणुन गुजरात सरकारने शेतकऱ्यांना मोबाईल घेण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना बनविली आहे.

शेतकऱ्यांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी दिले जाणार आर्थिक साहाय्य

शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार हायटेक बनवण्यासाठी गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारच्या कृषी विभागानुसार, गुजरात राज्यातील शेतकऱ्यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी 1500 रुपयापर्यंत मदत हि केली जाणार आहे. असे सांगितले जात आहे की गुजरात सरकारची हि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि त्यामुळे गुजरात राज्यातील अल्पभूधारक व गरीब शेतकरी देखील मोबाईल खरेदी करू शकतील. आजच्या ह्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात मोबाईल गरजेचा झाला आहे, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना. स्मार्टफोन चा उपयोग हा शेतीमध्ये अनेक ठिकाणी केला जातो. त्यामुळे ह्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होणार असा सरकारचा दावा आहे.

मोबाईलच्या एकूण किमतीचा 10 टक्के अनुदान दिले जाणार

गुजरातच्या कृषी विभागानुसार गुजरातमधील कोणताही जमीनधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना गुजरात सरकारच्या i-khedut पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

ह्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 1,500 रुपयांपेक्षा जास्त स्मार्टफोनच्या एकूण किमतीच्या 10 टक्के मदत हि केली जाऊ शकते. गुजरात सरकारने ह्या संदर्भात एक शासन निर्णय म्हणजे जीआर देखील काढला आहे. हे अनुदान फक्त स्मार्टफोनच्या किमतीसाठी दिले जाणार आहे, याशिवाय पॉवर बॅकअप डिव्हाइसेस, इअरफोन्स, चार्जर इत्यादी इतर कोणत्याही ऍक्सेसरीजसाठी ही योजना वैध नाही. गुजरात राज्यातील सर्व जमीनधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत, परंतु संयुक्त सातबाऱ्यातील केवळ एकच लाभार्थी पात्र असेल.

शेतकऱ्यांना मोबाईलमुळे हे होतील फायदे

शेतकऱ्यांना स्मार्टफोनमुळे हवामानाचा अंदाज, संभाव्य किडीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाच्या विविध योजना, आधुनिक शेती तंत्र आणि तज्ज्ञांचे मत आदींची माहिती मिळणे सोपे होणार आहे.

तसेच मोबाईलमुळे राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करणे शेतकऱ्यांना सोपे होईल. शेतकरी स्मार्टफोनचा वापर ईमेल, मेसेज करण्यासाठी करू शकतील त्यामुळे माहितीची देवाणघेवाण करणे सोपे होईल. स्मार्टफोनच्या गुगल मॅपचा वापर करून शेतकरी बांधव कुठलेही ठिकाण सहज शोधु शकता त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पिक विकायला सोपे होणार आहे. वेब ब्राउझर, इंटरनेट यासारख्या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीचा वापर करून शेतकरी बांधव विविध माहिती एका क्लिकवर घेऊ शकतील. गुजरातमधील शेतकऱ्यांचा ह्या योजनेसाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर, स्मार्टफोनच्या खरेदी बिलाची प्रत, मोबाइल आयएमईआय क्रमांक, रद्द केलेला धनादेश इत्यादी कागदपत्र शासनाला द्यावे लागणार आहेत.

 माहितीस्रोत-टीव्ही9भारतवर्ष हिंदी

English Summary: gujraat state goverment give 1500 subsidy for purchasing smartphone Published on: 22 November 2021, 06:22 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters