Morbi Bridge: गुजरात येथील मोरबी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी माचू नदीवर (Machu River) येथील झुलता पूल कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 141 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कर, एनडीआरएफच्या (NDRF) पथकांनी आतापर्यंत १७७ जणांची सुटका केली आहे.
हा पूल उत्तराखंड येथे गंगा नदीवर बनवण्यात आलेलेला राम आणि लक्ष्मण झुलता पुला सारखा आहे. हे दोन्ही पूल सस्पेंशन सारखे होते. ज्यामुळे या पूलावरून चालतांना ते वरखाली होतात. एखाद्या व्यक्तीचे सरासरी वजन 60 किलो गृहीत धरले तर त्या वेळी पुलावरील वजन 30 हजार किलो किंवा 30 टन होते असा अंदाज बांधता येईल.
मोरबी येथील पूल देखील या सारखाच होता. हा पूल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येत होते. रविवारी संध्याकाळी जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा पुलावर तब्बल ४०० पेक्षा जास्त नागरिक होते.
गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! पूल तुटल्याने शेकडो लोक पाण्यात बुडाले; आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू
हा पूल १८७९ मध्ये बांधण्यात आला
20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी हा पूल 1880 मध्ये सुमारे 3.50 लाख खर्चून पूर्ण झाला होता. त्यावेळी पुलाचे साहित्य इंग्लंडहून आणले होते. दरबारगड आणि नजरबागला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता.
मोरबीचा हा पूल 140 वर्षांहून जुना आहे. हा पूल गुजरातच्या मोरबीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. हा पूल ७६५ फूट लांब आणि साडेचार फूट (४.६ फूट) रुंद आहे. 1887 मध्ये जेव्हा पूल बांधला गेला तेव्हा तो जमिनीपासून 60 फूट उंच होता.
या पूलामुळे मोरबीची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. हा पूल युरोपात सर्वाधिक चांगला बनवण्यात आला होता. मोरबीचे राज्यकर्ते सर वाघजी यांनी हा पूल त्यावेळी बांधला होता.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये काय फरक आहे? बाईक डिझेलवर का चालत नाही? जाणून घ्या उत्तर
Share your comments