1. बातम्या

आत्मनिर्भर मेळाव्यातून फायदेशीर शेतीबाबत मार्गदर्शन ; सेंद्रिय शेतीचा कानमंत्र

नाशिक जिह्यातील पिंपळगाव बसवंत मधील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजित प्रमिला लॉन्स येथे आयोजित आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्यात उपस्थित तज्ज्ञांनी फायदेशीर शेती कशी करावी, व शेती पद्धतीत बदल करण्याचे आवाहन, योगिक आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व तसेच शेती पद्धतीतील बदल याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

Guidance on profitable farming through self-help fairs; The mantra of organic farming

Guidance on profitable farming through self-help fairs; The mantra of organic farming

नाशिक जिह्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्स येथे आयोजित आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्यात उपस्थित तज्ज्ञांनी फायदेशीर शेती कशी करावी, व शेती पद्धतीत बदल करण्याचे आवाहन, योगिक आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व तसेच शेती पद्धतीतील बदल याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजित आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी माउंट आबूवरून राजयोगी ग्राम कृषी आणि ग्राम विकास प्रभागाचे मुख्यालय समन्वयक राजूभाईजी उपस्थित होते.

सोबतच इचलकरंजी येथील कृषितज्ज्ञ बाळासाहेब घुगे, कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, सह्याद्री फाम्र्सचे विलास शिंदे, सुनंदा दीदी,वासंती दीदी, सरपंच अलका बनकर आदी उपस्थित होते. जगातील १९८ देशांतील ५०० शास्त्रज्ञांनी चार हजार पानांचा अहवाल जागतिक वातावरणीय बदलाविषयी तयार केला आहे.

त्यानुसार २०५० पर्यंत जगातील सागर किनारपट्टीवरील अनेक शहरे, बेट आणि देश पाण्याखाली जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी बांबू लागवड अतिशय उपयुक्त असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. तसेच बांबू लागवडीविषयी माहिती दिली राजयोगच्या माध्यमातून योगिक शेती कशी केली जाते याविषयी राजूभाई यांनी माहिती दिली.

इचलकरंजीचे प्रयोगशील शेतकरी घुगे यांनी शाश्वत यौगिक आणि विषमुक्त शेती कशी करावी याबाबत माहिती दिली तसेच याविषयी सविस्तर उदाहरण दिले. सेंद्रिय शेती करून आपण समाजासाठी काम करायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे. सह्याद्री फाम्र्सचे विलास शिंदे यांनी सेंद्रिय आणि रसायनमुक्त शेती ही भविष्यातील काळाची गरज आहे असे सांगितले. सुनंदा दीदी यांनी ध्यानधारणेद्वारे आंतरिक जगाची सफर घडवून आणली.

वासंती दीदी यांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी राजयोग कसा महत्वाचा आहे याबाबत माहिती दिली. कृषितज्ज्ञ वार्डेकर यांनी रिफाइंड तेल आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगून लाकडी आणि लोखंडी घाण्याचे रिफाइंड न केलेले तेल चांगले असल्याचे सांगितले. डी फोर डान्स अकॅडमीचे संजय सोनार आणि पथकाने नृत्याद्वारे श्रोत्यांमध्ये देशभक्ती जागृत केली. यावेळी प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभात फेरीचे उद्घाटन सरपंच अलका बनकर यांनी केले. सूत्रसंचालन पुष्पादीदी व पूनमदीदी यांनी केले. आभार सरलादीदी यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या
सिगारेटचे व्यसन आहे नुकसानदायी; जर तुम्हाला सोडायचं असेल हे व्यसन तर घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
अतिशय महत्वाची माहिती! गोबर गॅस प्लांट कसा उभारायचा? याबद्दल घ्या सविस्तर माहिती

English Summary: Guidance on profitable farming through self-help fairs; The mantra of organic farming Published on: 28 April 2022, 11:44 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters