बंगालचा उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पाऊस थांबल्याने राज्यातील कमाल तापमानात काही ठिकाणी 4 ते पाच अंशांनी वाढ झाली होती. वातावरणातील बदलामुळे उकाड्यातही अचानक वाढ झाली आहे.
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. या येणाऱ्या पावसाचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार असून शेतकरी सुखावणार आहे.
कोकणात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ठाणे, रायगड सह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाडा विभागातील लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजांचा कडकडाट सहपावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Share your comments